नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. उत्तम अभिनय शैली आणि योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग अफाट आहे. लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अमेय मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन कलकारांचा मोठा फॅन आहे. खुद्द अमेयने याबाबत माहिती दिली आहे.
लवकरच ‘कलरफुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्ट शेअर केले आहे. त्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अमेय वाघने देखील कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमेयने कमेंट करत ‘मी या दोन्ही कलाकरांचा फॅन आहे. तिकिट काढून चित्रपटगृहामध्ये कलरफूल बघणार’ असे म्हटले आहे. त्याची ही कमेंट सध्या चर्चेत आहे.
नवनवीन आणि साध्या विषयांवर प्रतिभावन कलाकृतीला घडवणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे ‘कलरफुल’ हा रंगांनी भरलेला चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या पोस्टरमध्ये एक जोडपं निसर्गरम्य वातावरणात बसलेले दिसत आहेत. करण आणि मीरा अशी या पात्रांची नावं असून या दोघांची ही कथा आहे. ‘कलरफुल’च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असून या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:47 pm