बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओज, ट्विट यांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यावेळीही बिग बींनी असंच एक पत्र आपल्या चाहत्यांसाठी लिहिलं होतं. मात्र या पत्रातील बिग बींचं हस्ताक्षर पाहून कार्तिक आर्यनने त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची ही गंमतीशीर कॉमेंट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या
अवश्य पाहा – सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेत्री पडली आजारी; होऊ लागलाय लो बीपीचा त्रास
काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?
“कीबोर्ड राइटिंगऐवजी हातांनी लिहिणं चांगलं असतं. आपल्याला कायम नवं काही तरी शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. पुन्हा एकदा हातांनी लिहिण्याचा ट्रेंड आणा. हा ट्रेंड आपल्या मेंदूसाठी चांगला आहे.” अशा आशयाचे हस्तलिखित पत्र अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी लिहिले होते.
या पत्रावरील हस्ताक्षर पाहून कार्तिक आर्यन चकित झाला. “मी डॉक्टर कुटुंबातील मुलगा आहे सर. माझं हस्ताक्षर पाहून तुम्ही चकित व्हाल.” अशा आशयाची कॉमेंट कार्तिकने केली. या कॉमेंटखाली अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बरोबर बोलताय अमितजी तुम्ही. मी देखील आजही हातांनीच लिहणं पसंत करते. त्यामुळे मला नवं काहीतरी शिकता येते.” अमिताभ बच्चन यांचं हे हस्तलिखित पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.