बॉलिवूडमध्ये ज्या दिवाळी पार्टीची सगळे आतुरतेने वाट पाहत असतात ती दिवाळी पार्टी बच्चन कुटुंबियांकडे असते. पण यावर्षी बिग बी यांनी कोणताही सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षी जलसा बंगल्यावर कोणत्याही पार्टीचे आयोजन करण्यात येणार नाहीये. यावेळी त्यांनी अगदी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. बिग बी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर घरातले लक्ष्मी पुजनाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बी, पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांच्यासोबत लक्ष्मीपूजन करताना दिसतात.
T 2585 – To all .. for all ; सब के लिए .. सबों के लिए pic.twitter.com/vTJROKnp6X
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 19, 2017
यावर्षी मार्च महिन्यात ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांचे कर्करोगाने निधन झाले. संपूर्ण राय कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत बच्चन कुटुंबियांनी वर्षभर कोणतेही सण- उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे न करण्याचा निर्णय घेतला. अमिताभ यांनी त्यांचा ७५ वा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा न करत मालदीवला जाऊन कुटुंबियांसोबत वेळ घालवला.
T 2585 – दीपावली की अनेक अनेक शुभकामनएँ , स्नेह आदर और प्यार !?? pic.twitter.com/Sxwt80vZXb
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 19, 2017
दरवर्षी बिग बींच्या जलसा बंगल्यावर दिवाळीची पार्टी होते. यावेळी नातेवाईकांसोबतच बॉलिवूडचे अनेक कलाकारही या पार्टीला हजेरी लावतात. तसेच पार्टीत अनेक खेळांचे आयोजन केले जाते. बिग बी यांचे प्रतीक्षा, जलसा आणि जनक हे तीन बंगले आहेत. दिवाळी हे तीनही बंगले ज्यापद्धतीने सजवले जातात ते पाहणे फारच कुतुहलाचे असते.
T 2585 – दीपावली की शुभकामनाएँ , शेन आदर !!?? pic.twitter.com/wiGf6f1vMe
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 19, 2017
सध्या अमिताभ त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. या शोने अनेक नावाजलेल्या कार्यक्रमांना टीआरपीच्या बाबतीत मागे टाकले आहे. २३ ऑक्टोबरला या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित होईल. त्यानंतर तीन नवीन शो सुरू करण्यात येतील.