05 June 2020

News Flash

फेसबुकवर ‘बिग बी’चे दोन कोटी चाहते!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या फेसबुक खात्यावरील चाहत्यांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. ७२ वर्षीय अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात.

| March 23, 2015 12:35 pm

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या फेसबुक खात्यावरील चाहत्यांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. ७२ वर्षीय अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. टि्वटर, फेसबुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून नियमितपणे ते आपल्या चाहत्यांशी जोडले गेलेले असतात. आपल्या ब्लॉगवर लिहिलेल्या संदेशात अमिताभ बच्चन म्हणतात, होय, आता फेसबुकवर दोन कोटी चाहते जोडले गेले आहेत. आपल्या प्रेमामुळेच हे संभव होऊ शकले. आता मी अजून एका कीर्तीमानाचा धनी झालो असून, त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. टि्वटरवर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या १ कोटी ३७ लाखांच्या आसपास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:35 pm

Web Title: amitabh bachchan now has milestone 20 million followers on facebook
Next Stories
1 पाहाः अमिताभ, दीपिकाच्या ‘पीकू’चा टीझर
2 शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
3 बेगम करिना भडकली, सैफने नव्हता मागितला ‘पद्मश्री’!
Just Now!
X