News Flash

बिग बींनी जोडले स्पर्धकासमोर हात; कारण वाचून व्हाल हैराण

...म्हणून बिग बींनी स्पर्धकाची मागितली माफी

छोट्या पडद्यावर ‘केबीसी’ म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. आतापर्यंत या पर्वात अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली असून दिवसेंदिवस हा शो रंजक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अलिकडेच झालेल्या एका भागात अमिताभ बच्चन यांनी चक्क स्पर्धकाची माफी मागितल्याचं दिसून आलं.

बॉलिवूड स्टार म्हटलं की त्यांचा चाहता वर्ग हा ओघाओघाने आलाच. अशाच एका शाहरुखच्या चाहतीने अलिकडेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या चाहतीने बिग बी यांची खटकलेली एक गोष्ट त्यांना थेटपणे सांगितलं. इतकंच नाही तर अमिताभ यांनीही मोठ्या मनाने या तरुणीची माफी मागितली.

‘मोहब्बते’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांनी शाहरुखला चांगलंच खडसावलं होतं. त्याच्यावर संतापले होते. मात्र, रेखा रानीला हे अजिबात पटलं नसून तिने बिग बींना असं करण्यामागचं कारण विचारलं. त्यावर अमिताभ यांनीही स्पष्टीकरण देत, तो चित्रपटाचा भाग असल्याचं सांगितलं. मात्र, रेखा रानी काही केल्या ऐकून घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे बिग बींनी तिची माफी मागितली.

आणखी वाचा- ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकले, स्पर्धकाला हरताना पाहून अमिताभ बच्चन देखील झाले दु:खी

“मोहब्बते चित्रपटात तुम्ही शाहरुखला ओरडलात. तसंच ‘कभी खुशी कभी गम’मध्ये तर तुम्ही त्याला घराबाहेर काढलं. त्यावेळी मी खूप रडले होते”, असं रेखा रानी म्हणाली. त्यावर अमिताभ बच्चन यांनी रेखा रानीची माफी मागत, शाहरुख जेव्हा भेटेल त्यावेळी त्याचीही माफी मागेन असं म्हटलं. दरम्यान, सध्या या सेटवरील बिग बी आणि स्पर्धक यांच्यात झालेल्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:52 am

Web Title: amitabh bachchan says will apologize shahrukh khan kbc contestant ssj 93
Next Stories
1 जाणून घ्या,बिग बॉसच्या घरात येणारा अली गोणी आहे तरी कोण?
2 Birthday Special : ‘या’ अभिनेत्यासोबत तब्बू होती दहा वर्षे रिलेशनशीपमध्ये
3 चित्रपट महामंडळाला बदनाम करणाऱ्यांवर लवकरच कारवाई
Just Now!
X