News Flash

डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बिग बींची खास पोस्ट; म्हणाले…

बिग बींनी मानले डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांचे आभार

अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्य मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यालवर उपचार सुरु आहेत. या काळात ते सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. यामध्ये त्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी रुग्णालयातील प्रशासनाचे आभार मानले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटमध्ये देवदूत आहेत असं म्हटलं आहे. “ते कोणत्याही बिकट परिस्थितीत काम करत असतात. त्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्माचारी हे देवाचे दूत आहेत. पांढऱ्या पीपीई किटमधील देवाचे दूत. परंतु, तरी सुद्धा ते रुग्णांच्या आरोग्याची देवाकडे प्रार्थना करत असतात”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

दरम्यान, करोनाची लागण झाल्यामुळे बिग बी आणि अभिषेक बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यासोबत ऐश्वर्या आणि आराध्यालादेखील करोनाची लागण झाली होती. परंतु, त्या दोघांचीही चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:05 pm

Web Title: amitabh bachchan shares post for health workers from hospital says gods own angel in ppe kit ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अभिज्ञा भावे पुन्हा प्रेमात; ‘त्या’ खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो
2 “माझ्या गावासाठी हा ऐतिहासिक क्षण”; Rafale आगमनानंतर अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
3 ‘आत्महत्येमुळे ज्यांनी त्रास दिला, त्यांना वेदना होतील असे तरुणाईला वाटते का?’ हेमंत ढोमेचा सवाल
Just Now!
X