19 September 2020

News Flash

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला बिग बींनी लिहिलं पत्र

पत्रास कारण की...

अमिताभ बच्चन

कोणत्याही गॉडफादरशिवाय किंवा कोणाच्याही वरदहस्ताशिवाय दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये राजकुमार रावचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या प्रत्येक चित्रपटात हटके भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. राजकुमारच्या अभिनयाची प्रशंसा करण्यापासून बिग बीसुद्धा स्वत:ला रोखू शकले नाहीत. नुकताच त्याचा ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करतोय. याशिवाय अनेकांनी चित्रपटातील राजकुमारने साकारलेल्या भूमिकेची खूप प्रशंसा केली. बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनीसुद्धा राजकुमारची स्तुती करत त्याला स्वत:च्या हस्ताक्षरात एक पत्र लिहिले.

बिग बी त्यांच्या मनाला भावलेल्या गोष्टीची प्रशंसा आवर्जून करतात. त्यांच्याकडून दाद मिळाल्याची गोष्ट कोणत्याही कलाकारासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. राजकुमारनेही ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले. ‘जेव्हा स्वत:च्या हस्ताक्षरात महानायक तुम्हाला पत्र पाठवतात… बच्चन सर तुमचे खूप आभार. तुमच्यामुळे माझा आजचा दिवस चांगला गेला,’ असं त्याने ट्विटमध्ये लिहिलंय.

राजकुमार रावला पाठवलेल्या या पत्रात बिग बींनी म्हटले की, ‘तुमचा ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट मी पाहिला. भारावून टाकणारा चित्रपट आहे. चित्रपट पाहून मी भारावून गेलोय. तुमच्या कामाचा मी सुरुवातीपासूनच प्रशंसक राहिलोय, पण या चित्रपटात तुम्ही साकारलेली भूमिका सुंदर आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा, स्नेह! अमिताभ बच्चन’ या चित्रपटाचं कौतुक करत बिग बींनी एक ट्विटदेखील केलंय.

VIDEO : ‘तेरे बिना’ गाण्यात श्रद्धा आणि अंकुरचा रोमॅण्टिक अंदाज

१८ ऑगस्ट रोजी ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव व्यतिरिक्त क्रिती सेनन आणि आयुषमान खुराना यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 8:52 pm

Web Title: amitabh bachchan wrote letter to rajkummar rao for his outstanding performance in bareilly ki barfi
Next Stories
1 सोनाक्षी कोणाला जीवे मारण्याचा बेत आखतेय?
2 संजय दत्तच्या मुलीची ‘ही’ ओळख तुम्हाला माहितीये का?
3 VIDEO : ‘तेरे बिना’ गाण्यात श्रद्धा आणि अंकुरचा रोमॅण्टिक अंदाज
Just Now!
X