News Flash

बूँद बूँद से सागर भरता है; अमृताने केली करोनाग्रस्तांची मदत

करोनाशी लढण्यासाठी अमृताने केली आर्थिक मदत

करोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील लोक आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करत आहेत. दरम्यान मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं देखील मदतनिधी जाहीर केला आहे.

अवश्य पाहा – लॉकडाउनमध्ये मलायका करतेय बेसनचे लाडू

अमृतानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम देऊ केली आहे. मात्र तिने रकमेचा आकडा जाहीर केलेला नाही. अमृताने ट्विट करुन ही माहिती दिली. व तसेच राज्यातील इतर जनतेला देखील तिनं मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

अवश्य वाचा – पतीवर खोटे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीची चित्रपटातून झाली हकालपट्टी

अमृता व्यतिरिक्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर अक्षय कुमार, विकी कौशल, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, राजकुमार राव, सारा अली खान यांसारख्या अनेक कलाकारांनी मदत निधी देऊ केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 8:05 pm

Web Title: amruta khanvilkar donate money for coronavirus disease mppg 94
Next Stories
1 ‘तुला पाहते रे’ आणि ‘जय मल्हार’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
2 हे ट्विटरवॉर आहे की नळावरचं भांडण? दोन अभिनेत्रींच्या वादामुळे पडला प्रश्न
3 बऱ्याच दिवसाने मिलिंद सोमण भाजी घेण्यास गेला अन्…
Just Now!
X