News Flash

अशी असते अमृताच्या दिवसाची सुरूवात, योगासोबत योग्य सकाळ

अमृताने शेअर केला व्हिडीओ

फिट राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मोठी मेहनत घेत असतात. जिम, वेगवेगळे व्यायाम तसचं डाएटवर त्यांचं पुरेपूर लक्ष असतं. न चुकता वर्क आउट करण्यावर या सेलिब्रिटीजचा भर असतो.

मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे लक्ष देते. वर्कआउट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो. नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. दिवसाची सुरुवात योगाने करत तिने हा व्हिडीओ चाहत्यांसाठी पोस्ट केलाय. या व्हिडीओत अमृता अनेक योगासनं करताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

” एक अशी गोष्टी असावी तिच्याकडे तुम्ही मोठ्या आदराने पुन्हा कधीही येऊ शकता आणि ती फक्त आणि फक्त तुमचीच आहे. तुम्ही कदाचित सर्वांसोबत बसाल, मजा कराल, थोडा वेळ घालवाल पण त्या एका गोष्टीचं जतन करा जिच्यावर तुमचा विश्वास आहे. परत येणं हे कायमच चांगलं असंत” असं कॅप्शन अमृताने या व्हिडीओला दिलंय. तर हॅशटॅग वापरत तिने ‘योग्य सकाळ, मी पुन्हा इथं कायम परत येऊ शकते.’ असं लिहलं आहे. यावरुन अमृता हे योगा बदद्ल बोलत असल्याचं लक्षात येतंय. याआधी देखील योगा केल्यानं फक्त फिटनेस नाहितर मानसिक स्वास्थही चांगलं झाल्याचं अमृताने सांगितलं आहे.

अमृताच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंत केलंय. अभिनेत्री सोनाली खरे आणि अमृताचा पती हिमांशू मल्होत्रानेदेखील तिचं कौतुक केलंय.

अभिनयासोबतच तिच्या जबरदस्त डान्समुळे अमृताने अनेकांची मनं जिकंली आहेत.’राजी’, ‘मलंग’ या हिंदी सिनेमांसोबतच ‘डॅमेज्ड’ या हिंदी वेब सीरिजमधून अमृता झळकली आहे.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 12:27 pm

Web Title: amruta khanvilkar shares video of yoga on her instagram page kpw 89
Next Stories
1 ‘हे मन बावरे’मधील अभिनेत्याने केले दुसऱ्यांदा लग्न
2 करोनाचं संकट असूनही जान्हवी करतेय प्रमोशन, कारण..
3 ‘बाफ्टा’ पुरस्कारांमध्ये आदर्श गौरवला नामांकन, प्रियांका चोप्राने दिल्या शुभेच्छा
Just Now!
X