News Flash

Video: अक्षयचा ‘बाला चॅलेंज’ स्वीकारला अमृताच्या घरातील चिमुकल्याने

सोशल मीडियावर ‘बाला चॅलेंज’चा धुमाकूळ

अभिनेता अक्षय कुमार याने बॉलिवूड कलाकारांना दिलेला ‘बाला चॅलेंज’ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अक्षयने दिलेले हे आव्हान वरुन धवन, रणवीर सिंग, करिना कपूर, अर्जून कपूर, कियारा अडवाणी यांसारख्या अनेक कलाकारांनी स्विकारले असुन ते बाला डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही तिच्या घरातील सुपर क्युट डान्सरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत अमृताच्या घरातील एक चिमुकला सदस्य अक्षय कुमारच्या गाण्यावर बाला नृत्य करताना दिसत आहे. “आमच्या घरातील या क्युट बाला डान्सरला एकदा पाहाच, त्याच्या डान्स स्टेप पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.” असे म्हणत अमृताने ट्विट केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने अक्षय कुमार आणि रितेश देशमुखला टॅग केलं आहे.

Bala Challenge Video: सोशल मीडियावर ‘बाला चॅलेंज’चा धुमाकूळ

अकाली केस गळतीशी झगडणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असलेला बाला हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे. परंतु हा चित्रपट आयुष्यमानपेक्षा अक्षय कुमारच्या ‘बाला चॅलेंज’मुळेच जास्त चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:25 pm

Web Title: amruta khanvilkar the cutest bala challenge from our house mppg 94
Next Stories
1 Photo : बोल्ड अंदाजात सोनमने शेअर केले फोटो
2 अल्बम लॉन्च झाला, पण रानू मंडल सध्या करतात काय?
3 परिणीतीचं पहिलं ‘क्रश’ माहितीये का?
Just Now!
X