News Flash

दिवाळीच्या निमित्ताने हिमांशूने दिली अमृताला खास भेट

अमृताच्या दिवाळ सणाची सुरुवात अगदी दणक्यात झाली आहे असेच म्हणावे लागेल.

अमृता खानविलकर, हिमांशु मल्होत्रा

दिवाळी हा एक असा सण आहे ज्यामध्ये सर्वचजण त्यांच्या त्यांच्या परीने इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही दिवाळी म्हणजे फराळ, कंदील आणि दिव्यांची आरास असा बेतच अनेकजण आखतात. या सणाच्या निमित्ताने सध्या सगळीकडेच आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या या उत्साही वातावरणापासून कलाकारही स्वत:ला रोखून शकले नाहीत. दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण एकमेकांना भेटवस्तू देण्यास प्राधान्य देतात. अभिनेत्री अमृता खानविलकरलाही अशीच एक खास भेट मिळाली आहे. त्यामुळे तिने तिचा आनंद सोशल मीडियावरही अगदी न विसरता व्यक्त केला आहे.

अमृताला तिच्या पतीने म्हणजेच हिमांशू मल्होत्राने एक खास भेट दिली आहे. स्वत:च्या हाताने पणती बनवून आणि ती सजवून हिंमांशूने ती अमृताला भेट म्हणून दिली आहे. अमृताला दिवाळी हा सण फार आवडतो त्यामुळे हिमांशूने तिला ही पणत्यांची भेट दिली आहे.

ऐन दिवाळीच्या मोक्यावरच अमृताला ही भेट खास भेट मिळाल्यामुळे तिच्या दिवाळीची सुरुवात अगदी दणक्यात झाली आहे असेच म्हणावे लागेल. अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा ही जोडी मराठी आणि हिंदी टेलिव्हीजन विश्वातही नेहमीच चर्चेत असते. पण, सध्या तरी या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे आणि हिंमांशूच्या कलात्मक भेटीमुळे ही जोडी चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 11:07 am

Web Title: amrutas husband himanshu malhotra himself made diyas and gave her diwali gift
Next Stories
1 बहुचर्चित ‘काबिल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
2 Video: त्याने ‘किस’ करुन अनुष्काच्या गाण्याला दिली दाद
3 बुद्धावरील चित्रपटामुळे जनजीवनात बदल – गगन मलिक
Just Now!
X