डिस्नेच्या नव्या ‘जंगल बुक’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. कारण बऱ्याच वर्षांनंतर गीतकार गुलजार यांनी वर्णन केलेला हा चड्डी पहनके बाहेर पडलेला मोगली पुन्हा एकदा भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर आला होता. फक्त या वेळी या मोगलीचा चेहरा अ‍ॅनिमेटेड नव्हता तर तिथे एक खरोखरच लहान, निरागस भाव असलेला चेहरा मोगली म्हणून खऱ्याखुऱ्या प्राण्यांच्या जंगलात वावरताना दिसला. त्याला जोड होती ती बॉलिवूड कलाकारांच्या आवाजाची. आता हाच मोगली सीरिजच्या माध्यमातून नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

येत्या ७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ हिंदी व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. या हिंदी व्हर्जनमधील पात्रांना बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
Samsung company release To Galaxy AI features for flagship devices Check list if your phone is on the list
आनंदाची बातमी! आता सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये येणार AI फीचर्स; पाहा संपूर्ण यादी
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

अभिनेत्री करिना कपूर खान ‘का’ या पात्रासाठी आवाज देणार आहे. तर बगिरासाठी अभिषेक बच्चन, बालूसाठी अनिल कपूर, शेर खानसाठी जॅकी श्रॉफ आवाज देणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित डिजीटल प्लॅटफॉर्मसाठी पहिल्यांदाच काम करत आहे. माधुरी निशा या पात्रासाठी आवाज देणार आहे.

रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘द जंगल बुक’ या पुस्तकावर ‘मोगली- लेजंड ऑफ द जंगल’ बेतलेला आहे. अँडी सर्कीजने याचे दिग्दर्शन केले असून मोगलीच्या भूमिकेत भारतीय वंशाचा अमेरिकन कलाकार रोहन चांद दिसणार आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी व्हर्जनला हॉलिवूडच्या मोठमोठ्या कलाकारांनी आवाज दिला आहे.