News Flash

“माझा पती काही कामाचा नाही आणि…”, अनिता हसनंदानीने शेअर केले पतीसोबतचे चॅट

अनिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे.

अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि अभिनेता रोहित रेड्डी यांची जोडी ही छोट्या पडद्यावरी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. अनिता पती रोहित सोबत नेहमीच कॉमेडि व्हिडीओ आणि रिल्स शेअर करताना दिसते. मात्र, आता अनिताने रोहितसोबतच्या चॅटचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करत रोहित काही कामाचा नाही तो रोमॅंटिक नाही असं अनिता म्हणाली आहे.

अनिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या चॅटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. अनिताने अमेरिकेतील लोकप्रिय गायक ब्रूनो मार्सच्या एका गाण्याचे लिरिक्स पाठवले. त्या गाण्याचं नाव ‘द डोर ओपन बाय सिल्क सॉनिक’ आहे. हे गाणं ब्रूनो मार्स अॅन्ड एंडरसन. पाक याचं आहे. या गाण्याचे लिरिक्स अनिताने मेसेज सारखे पाठवले मात्र रोहितला ते काही समजलं नाही आणि तो नेहमीसारखा रिप्लाय तिला देत होता.

त्यांच्या या चॅटचा स्क्रिन शॉट शेअर करत अनिता म्हणाली, “जेव्हा मी माझ्या पतीला लिरिक्स पाठवले”, या सोबत तिने काही हसण्याची इमोजी देखील वापरले आहेत. पुढे ती म्हणाली, “रोहित रेड्डी काही कामाचा नाही तो रोमॅंटिक नाही बाय”, म्हणतं ती हसली.

तर, दुसरीकडे रोहित घरी आल्यानंतर त्याने अनिता आणि त्यांच्या मुलाचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांचा मुलगा हा अनिताच्या मांडीवर झोपत असल्याचे दिसत आहे. तर अनिताही झोपली आहे. “माझ्या जान्स” असे कॅप्शन रोहितने तो फोटो शेअर करतं दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

आणखी वाचा : “लाज वाटत नाही का”, मालिकेतील संस्कारी सुनेचा बिकीनी अवतार पाहून चाहते संतप्त

या दोघांचे लाखो चाहते आहेत. यांचे विनोदी व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. फक्त हे दोघे नाही तर त्यांचा मुलगा आरवचे ही हजारो चाहते आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 11:43 am

Web Title: anita hassanandani calls husband rohit reddy useless and unromantic here is why dcp 98
Next Stories
1 लंडनला एकत्र फिरायला जाण्यासाठी अमिताभ-जया यांनी घेतला होता लग्नाचा निर्णय
2 “भयानक डान्सर आहे”, नव्या डान्स व्हिडीओमुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंह पुन्हा ट्रोल
3 गायिका नीति मोहनने दिला मुलाला जन्म, पती निहार पांड्याने सोशल मीडियावरुन दिली माहिती
Just Now!
X