News Flash

Coronavirus : करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर अंकिता लोखंडेची सोसायटी सील

राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे

अंकिता लोखंडे

देशात दिवसेंदिवस करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. काही दिवसापूर्वी मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या इमारतीत करोनाग्रस्त व्यक्ती आढळून आली होती.त्यानंतर आता अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या सोसायटीमध्ये करोनाग्रस्त व्यक्ती आढळली आहे. त्यामुळे सध्या खबरदारीचा उपाय म्हणून आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी हा भाग सील करण्यात आला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अंकिता ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहते त्या कॉम्प्लेक्समधील एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण कॉम्प्लेक्सला सील करण्यात आलं आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अंकिताप्रमाणेच अशिता धवन, नताशा शर्मा, मिश्कत वर्मा यांसारखे सिलिब्रिटी राहतात.

“ही माहिती खरी आहे. माझ्याच विंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या ही व्यक्ती क्वारंटाइनमध्ये आहे. या साऱ्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि  बीएमसीने केलेल्या मदतीमुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते”, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री अशिता धवनने दिली.

करोनाची लागण झालेला व्यक्ती स्पेनवरुन भारतात परतला होती. विशेष म्हणजे भारतात आल्यानंतर विमानतळावर त्यांची करोनाची चाचणी केली होती. या चाचणीत त्यांचे रिपोर्टस निगेटिव्ह आले होते. परंतु १२ दिवसानंतर त्याच्यात करोनाची लक्षणं जाणवू लागली.

दरम्यान, राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच आहे. काही दिवसापूर्वी गोरेगावमधील बिंबीसारनगरमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आढळून आला होता. या परिसरात मराठी कलाविश्वातील सुबोध भावे, जयवंत वाडकर, आतिशा नाईक असे दिग्गज कलाकार राहतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 11:47 am

Web Title: ankita lokhande apartment sealed corona positive found in building ssj 93
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज मंगला गोडबोले अन् मेघना पेठे यांच्या कथांचं अभिवाचन
2 The Lockdown Tales :  ताहिराच्या वेब सीरिजमधून उलगडणार लॉकडाउनधील कथा
3 Video : प्रशांत दामलेंच्या सहीशिवाय सुरू होत नाही संकर्षणचं नवीन वर्ष
Just Now!
X