News Flash

सुशांतच्या फोटवर RIP लिहण्याची हिंमत झाली नाही; अंकिताने केला खुलासा

"मी त्याच्याशी बोलू शकले तर त्याला सांगेन..."

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे जवळपास 6 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. ‘पवित्र- रिश्ता’ या मालिकेतून दोघांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यावेळीच त्याच्या नात्यात जवळीक निर्माण झाली. अंकिता आणि सुशांतच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळायची. मात्र 2016 मध्ये अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप झालं.

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देश हळहळला. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता. सोशल मीडियावर केवळ सुशांतचे फोटो झळकत होते. चाहत्यांनी सुशांतचे फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्याची एक्स गर्लफ्रेण्ड असलेल्या अंकिताने सुशांतला श्रद्धांजली न वाहिल्याने तिला बरचं ट्रोल व्हाव लागलं. सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनंतर बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र 6 वर्ष सुशांतसोबत नात्यात असूनही अंकिता लोखंडेने एकही पोस्ट न केल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला.

सुशांतच्या आत्महत्येला जवळपास वर्ष पूर्ण होतंय. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने सुशातच्या फोटवर श्रद्धांजली वाहण्याची हिंमत नसल्याचं म्हणत या गोष्टीचा खुलासा केला आहे. अंकिता म्हणाली,” तो गेला त्यांच दिवशी मी त्याचा फोटो शेअर केला नाही म्हणून लोकांनी माझ्याबद्दल मतं माडंली. तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षित आहे? कुणी आपलं जवळचं जातं तेव्हा आपण काय फोटो टाकतो. तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाही, पण आजपर्यंत मी सुशांतचा फोटो शेअर करून RIP लिहलं नाही. त्याच्यासाठी असं काही लिहण्याची माझ्यात हिंमत नाही.” असं अंकिता म्हणाली.

मी आणि सुशांतच्या कुटुंबाने बरचं काही सहन केलं आहे असंही ती पुढे म्हणाली.”सुशांतचं जाणं हे आयुष्यभर माझ्यासोबत राहिल. आता मी नॉर्मल झाले आहे. पण आपण सर्व त्यातून गेलो आहोत. त्याचे कुटुंबीय, मी माझे आई वडील, मला वाटतं पूर्ण जग त्याच्यासाठी रडतं होतं. त्या दिवशीदेखील एक महिला माझ्याकडे येऊन रडत होती. मला वाटतं मी त्याच्याशी बोलू शकेन, मी त्याला सांगेल कि बघ लोकं तुझ्यासाठी, तुझ्यावर किती प्रेम करतात.”

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेक मजेशीर व्हिडीओ ती शेअर करते. यात बऱ्याचदा तिला अजूनही ट्रोल व्हावं लागतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 5:08 pm

Web Title: ankita lokhande confessed no guts to post a photo of sushant singh rajput with rip kpw 89
Next Stories
1 गंगुबाई काठियावाडी वादांच्या भोवऱ्यात, आलिया आणि संजय लीला भन्साळीला न्यायालयाने बजावले समन्स
2 आलियाच्या आईचा थेट उद्धव आणि आदित्य ठाकरेंना सवाल; म्हणाल्या, “लस आधी…”
3 आमिर खान पाठोपाठ आर माधवनला करोनाचा संसर्ग
Just Now!
X