News Flash

‘नैराश्यात असलेल्या प्रियकराला तुम्ही ड्रग्स देणार का?’; रियाला पाठिंबा देणाऱ्यांना अंकिताचा सवाल

"एकीकडे तिने सांगितले की सुशांतच्या आरोग्यासाठी ती सर्व डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि दुसरीकडे ती ड्रग्स मिळवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करत होती."

ज्या व्यक्तीवर तुमचं नितांत प्रेम आहे, तो व्यक्ती नैराश्यात असतानाही तुम्ही त्याला ड्रग्स देणार का, असा सवाल अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर तिला पाठिंबा दर्शविणाऱ्या कलाकारांना केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर बुधवारी अंकिताने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

“उशिरा जाग आलेल्या रियाच्या मित्रमैत्रिणींनो, थोडे लवकर जर तुमचे डोळे उघडले असते तर सुशांतकडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या गैरवर्तनाचं (जर ते गैरवर्तन झाल्यास) तिने समर्थन करू नये असा सल्ला तिला तुम्ही दिला असता. जेव्हा तिला त्याच्या मानसिक स्थितीबाबत पूर्णपणे माहिती होती आणि तो नैराश्यात होता हे तिने जाहीरपणे सांगितले होते. तिने एका नैराश्यग्रस्त व्यक्तीला अमली पदार्थांचे सेवन करण्याची परवानगी दिली पाहिजे होती का? ही कशा प्रकारची त्याची मदत झाली,” असा सवाल अंकिताने केला.

“एकीकडे तिने सांगितले की सुशांतच्या आरोग्यासाठी ती सर्व डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि दुसरीकडे ती ड्रग्स मिळवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करत होती. जर एखादी व्यक्ती सांगतेय की मला दुसऱ्या व्यक्तीवर नितांत प्रेम आहे, तर त्या दुसऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती माहित असतानाही त्याला अमली पदार्थांचं सेवत करू देणार का? तुम्ही असं करणार का,” असा प्रश्न उपस्थित करत अंकिताने रियावर टीका केली.

सुशांतच्या कुटुंबीयांना जर रियाने त्याच्या मानसिक स्थितीबद्दल कल्पना दिली होती तर त्याच्या अमली पदार्थांच्या सेवनाबद्दलही माहिती द्यायला पाहिजे होती, असंही अंकिताने म्हटलं. या पोस्टच्या अखेरीस आपण सुशांतच्या कुटुंबीयांच्या बाजूने शेवटपर्यंत खंबीरपणे उभं राहणार असल्याचं अंकिताने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 12:09 pm

Web Title: ankita lokhande on rhea chakraborty arrest should she have allowed a depressed man to consume drugs ssv 92
Next Stories
1 ड्रग्सविषयी काय म्हणाली होती रिया?; ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
2 ‘सूडाच्या राजकारणात सामान्य मरतो’; केदार शिंदेंनी व्यक्त केला संताप
3 शिवसेनेची आता सोनिया सेना झाली आहे : कंगना
Just Now!
X