News Flash

‘बाहुबली २’ चित्रपटात अशी दिसेल ‘देवसेना’..

'अमरेंद्र बाहुबली सोबत देवसेना..'

‘बाहुबली २’ चित्रपटात अशी दिसेल ‘देवसेना’..
छाया सौजन्य- ट्विटर

एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा आणखी एक पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. राजामौली यांनी स्वत: या चित्रपटाचा पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सध्या हा पोस्टर अनेकांचेच लक्ष वेधण्याचे कारण असे की, त्यामध्ये फक्त बाहुबलीच नव्हे तर, देवसेनेचीही झलक पाहायला मिळत आहे.

‘अमरेंद्र बाहुबली सोबत देवसेना..’ असे कॅप्शन देत एस. एस. राजामौली यांनी हा पोस्टर शेअर केला आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी या पोस्टरमध्ये सुरेख दिसत असून दोघांच्याही हातात धनुष्य दिसत आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अनुष्काच्या हातात साखळदंड पाहायला मिळाले होते. तसेच चित्रपटामधील तिचा लूकही डिग्लॅम होता. पण, ‘बाहुबली २’ मध्ये मात्र ती एका सम्राज्ञीच्या रुपात दिसू शकते. निदान हे पोस्टर पाहून असाच काहीसा अंदाज बांधण्यात येत आहे.

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. देशोदेशीच्या प्रेक्षकांवर भुरळ पाडण्यात यशस्वी झालेल्या या चित्रपटासाठी भव्य सेट, दाक्षिणात्य चित्रपटांमधील तगडी स्टारकास्ट पाहता विविधभाषी प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. बहुचर्चित ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण हैदराबादमध्ये केले गेले होते. कला दिग्दर्शक साबू सायरिल यांनी ‘बाहुबली २’ साठी नवीन साम्राज्य उभे केले होते.

‘बाहुबली २’ साठी बनलेल्या या नवीन साम्राज्याचे फोटोही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. ‘बाहुबली २’ चा हा सेट बनवण्यासाठी सुमारे ३०० ते ५०० कामगार वापरण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाच्या पहिल्याच भागासारखी भव्यता ‘बाहुबली २’द्वारेही अनुभवता येणार का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच लक्षात येणार आहे. ‘बाहुबली: द कन्क्लयुजन’ असे म्हणवला जाणारा हा चित्रपट ‘कटप्पा ने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी २८ एप्रिल २०१७ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 2:55 pm

Web Title: another brand new poster of baahubali 2 is out
Next Stories
1 हृतिकसाठी यामी गौतमने लिहिलेला हा भावूक संदेश वाचलात का?
2 हा एक अभिमानास्पद क्षण- कैलाश खेर
3 Raees box office collection day 1: बॉक्स ऑफिसवर ‘रईस’ ठरला ‘काबिल’
Just Now!
X