08 July 2020

News Flash

अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकवा… दिग्दर्शकाने दिलं भारतीयांना चॅलेंज

त्यांनी ट्विटरद्वारे हे चॅलेंज केले आहे.

आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. या यादीमध्ये ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा देखील समावेश आहे. नुकतात अनुभव यांनी केलेल ट्विट चर्चेत आहे. त्यांनी ट्विटमध्ये देशातील अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकून दाखवण्याचे चॅलेंज केले आहे.

अनुभव यांनी ट्विटमध्ये, ‘मी भारतीयांना चॅलेंज करतो की, एक तारीक ठरवा आणि देशातील अल्पसंख्यांकांच्या समोर गुडघे टेकून दाखवा. करु शकता? २ ऑक्टोबर रोजी? इतक्या वर्षांची माफी मागूया. ट्विटर आणि फेसबुकमधून बाहेर पडा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

या पाठोपाठ त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. मी सर्वांना बोलत आहे. दलित, आदिवासी सगळेच असे त्यांनी म्हटले.

अनुभव सिन्हा नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्यांचे मत मांडत असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील चर्चेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 7:00 pm

Web Title: anubhav sinha gives challenge to people to kneel in front of minorities says i challenge indians avb 95
Next Stories
1 Video : समाजातील प्रत्येक घटनेवर रोखठोक मत मांडणाऱ्या जितेंद्र जोशीची अनकट मुलाखत
2 ..पाच वर्ष रामगोपाल वर्मा घेत होता मनोज वाजपेयीचा शोध, कारण जाणून आश्चर्य वाटेल
3 प्रियदर्शन जाधवचं वेबविश्वात पदार्पण; सुरभी हांडेसह जमली भन्नाट केमिस्ट्री
Just Now!
X