प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करताना दिसतो. मात्र यावेळी तो महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहे. यावेळी लहानसहान नाही खूप मोठा फरक आहे. अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

प्रकरण काय आहे?

अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षांच्या आगमनाबाबत एक ट्विट केले होते. “नवीन वर्ष यायला आता काही दिवसच शिल्लक आहेत. जास्त काळजी करण्याची गरज नाही.” अशा आशयाचे ट्विट अमिताभ यांनी केले होते. या ट्विटवर आता अनुराग कश्यपने प्रतिक्रिया दिली. “यावेळी लहानसहान नाही खूप मोठा फरक आहे. तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आपल्या वाटणीचं ७०च्या दशकातच आम्हाला दिलं आहे.” अशा आशयाचे ट्विट त्याने केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपासून अमिताभ आजारी आहेत. प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही हजेरी लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर अनुराग कश्यपचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेकडो नेटकऱ्यांनी अनुरागच्या ट्विटचा आधार घेत अमिताभ यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.