27 January 2021

News Flash

“त्या दिवशी अनुरागने ड्रग्ज घेतले होते”; पायल घोषचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल…

पायल घोषने अनुराग कश्यपवर केले लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. सोबतच तिने एफआयआरदेखील दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलीस सध्या चौकशी करत आहेत. मात्र या चौकशीवर पायल नाखुश आहे. अनुराग खोटं बोलतोय असं म्हणत तिने पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान पायलने आता एक नवा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे तिने या व्हिडीओद्वारे सांगितलं आहे.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

काय म्हणाली पायल घोष?

“मी अनुरागला व्यक्तीश: ओळखत नव्हते. फेसबुकवरुन आमची ओळख झाली होती. त्यांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. मी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ते धुम्रपान आणि दारु पित होते. त्या विचित्र वासामुळे मला उलटीसारखं होत होतं. तो वास गांजा किंवा ड्रग्जचा होता. त्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या खोलीत नेलं अन् माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.” अशा आशयाचे आरोप या व्हिडीओद्वारे पायलने अनुराग कश्यपवर केले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी १०.०५ वाजता अनुराग चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाला होता. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता तो पोलीस स्थानकातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे जवळपास ८ तास अनुरागची चौकशी करण्यात आल्याचं दिसून येत आहे. अनुरागला चौकशीसाठी बोलावल्यानंतर अभिनेत्री पायल घोषने मुंबई पोलिसांचे आभार मानले. मात्र, याच काळात अनुरागच्या वकिलांनी प्रियांका खिमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागवरील आरोप फेटाळून लावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 1:45 pm

Web Title: anurag kashyap payal ghosh casting couch allegations mppg 94
Next Stories
1 अक्षय कुमार सांगतोय, “पती म्हणून माझी ही सवय सर्वांत वाईट”
2 लॉकडाउनमध्ये काम न मिळाल्याने अभिनेत्याला विकावी लागली बाईक
3 वेब सीरिजच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा अभिनयाकडे
Just Now!
X