News Flash

अनुष्काने अशा प्रकारे सांगितली तिच्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख

तिच्या आगामी सिनेमाचे नाव 'फिल्लौरी' असे आहे

‘एनएच १०’ सारखा जबरदस्त सिनेमा केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आता तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून बनणाऱ्या दुसऱ्या सिनेमाच्या तयारीलाही लागली आहे. तिच्या आगामी सिनेमाचे नाव ‘फिल्लौरी’ असे आहे. अनुष्काने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली. तिने सांगितले की, २४ मार्च २०१७ ही आहे ‘फिल्लौरी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख. आताच लिहून ठेवा.. खूप मजा येणार आहे.

अनुष्का शर्माच्या निर्मिती संस्थेअंतर्गत बनणाऱ्या ‘फिल्लौरी’ सिनेमाच्या कथेचा पहिला भाग लीक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘फिल्लौरी’ ही अशा मुलीची कथा आहे जिचे लग्न ठरले असून तिला मंगळ आहे. त्या मुलीवर असलेल्या मंगळाचा प्रभाव दूर करण्यासाठी तिचे लग्न आधी एका झाडाशी लावून नंतर मग मुलाशी केले जाते. खरं तर ही लीक झालेली कथा सिनेमाचा अगदी छोटासा भाग असल्याचे म्हटले जातेय. चित्रपटातील या प्रसंगाद्वारे समाजातील अंधविश्वास आणि चुकीच्या पद्धतीने चालत आलेल्या रुढी परंपरा दूर करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. यास फिल्मी तडका देण्यात येईल ते काही वेगळे सांगावयास नको. या सिनेमात अनुष्का शर्मा हिच्यासोबत ‘उडता पंजाब’ या सिनेमाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांज आणि सूरज शर्मा यांच्याही मुख्य भूमिका असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:20 pm

Web Title: anushka sharma revealed release date of her new movie
Next Stories
1 नव-याचा अपमान करणा-याला अभिनेत्रीने खडसावले
2 बर्थडे स्पेशलः या उत्तरामुळे सुश्मिता झालेली मिस यूनिव्हर्स
3 VIDEO: म्हणून सुश्मिता आहे परफेक्ट मॉम
Just Now!
X