मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाला नियमांच्या अधीन राहून राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी आता चित्रीकरण स्थळावरही पुन्हा करोनाचा शिरकाव झाला असल्याने कलाकार-तंत्रज्ञांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. अभिनेता अक्षय कुमार याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते,  त्यानंतर आता‘रामसेतू’ या अक्षय कु मारची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

गेल्या आठवड्यात माधुरी दीक्षित मुख्य परीक्षक असलेल्या ‘डान्स दिवाने’ या रिअ‍ॅलिटी शोच्या कर्मचारी समुहातील १८ जणांना करोनाची लागण झाली होती. सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करूनच चित्रिकरण सुरू आहे, मात्र आता सगळीकडेच करोनाचा संसर्ग वाढत चालला असल्याने चित्रिकरण स्थळी अधिक खबरदारी घेतली जात असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिली.

अभिनेता अक्षय कु मारला करोनाची लागण झाल्याची माहिती रविवारी मिळाल्यानंतर तो  चित्रीकरण करत असलेल्या ‘रामसेतू’ या चित्रपटासाठी काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञांच्या चमूचीही करोना चाचणी करण्यात आली. अक्षयने आपण खबरदारी म्हणून रुग्णालयात भरती होत असल्याचे समाजमाध्यमांवरून सोमवारी स्पष्ट के ले. ‘रामसेतू’च्या मढ येथील चित्रीकरणस्थळी ४५ जण करोना बाधित असल्याचे निदर्शनास आले, यापैकी ४० जण हे कनिष्ठ कलावंत (ज्युनिअर आर्टिस्ट्स) आहेत. तर पाचजण अक्षयचे रंगभूषाकार आणि त्यांचे सहाय्यक आहेत. सध्या या ४५ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून पुढचे किमान पंधरा दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती ‘फे डरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिली.

यापूर्वी अभिनेत्री अलिया भट्टलाही करोनाची लागण झाली होती, त्यानंतर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. सध्या चित्रीकरणादरम्यान एकालाही करोनाची लागण झाली, तर त्याच्या संपर्कात आलेल्या  सगळ्या कलाकार – कामगारांची चाचणी के ली जाते. त्यामुळे कोणी करोना बाधित असल्यास लगेच लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रीकरण स्थळांवर इतर तपासणी, करोना चाचणीचा अहवाल घेऊन काम करणे आणि अन्य नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आठवड्याखेरीस चित्रीकरण बंद

राज्य सरकारने सध्या जी नियमावली जाहीर के ली आहे ती लक्षात घेत या महिन्याभरात दर आठवड्याला शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. रात्रीचे चित्रीकरण करायचे असल्यास ते स्टुडिओच्या बंदिस्त जागेत करावे लागेल, बाहेर कु ठेही चित्रीकरण करता येणार नाही. त्यामुळे स्टुडिओबाहेर चित्रीकरणावरही अनेक निर्बंध आले असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट के ले. राज्यात करोनाचा आकडा वेगाने वाढत असल्याने पूर्ण चित्रीकरणावरच बंदी येण्यापेक्षा सरकारने जे नियम घालून दिले आहेत त्याचे पालन करून सुरक्षित वातावरणात चित्रिकरण करण्यावर निर्मात्यांपासून कलाकार – कामगारांपर्यंत सगळ्यांनीच भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.