बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी जेव्हा वेगळे राहणे सुरु केले, तेव्हाच त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना उधाण आले होते. पण आता दोघांनीही या बातमीवर पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघंही गेल्या आठवड्यात न्यायालयात गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चाही केली. याबरोबरच दोघांच्या वकिलांनी कागदपत्रांचे काम सुरु केले आहे.

याआधीही या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने येत होत्या, पण त्यानंतरही दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी दोघांनी आपल्या मुलाचा वाढदिवस एकत्र साजराही केला होता. यावेळी संपूर्ण कुटुंबही त्या पार्टीला उपस्थित होते. मलायका अनेक दिवसांपासून आपल्या मुलासोबत वेगळी राहत आहे.

तसेच बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता – दिग्दर्शक अरबाज खान ‘जीना इसी की नाम है’ या सिनेमात झळकणार आहे. अरबाजचा हा सिनेमा खास असणार आहे. कारण, या सिनेमाचे चित्रीकरण अमेरिकेतील राष्ट्रपती भवन म्हणजेच व्हाइट हाउसमध्ये होणार आहे.

‘जीना इसी की नाम है’ सिनेमाचे दिग्दर्शक केशव पानेरी म्हणाले की, व्हाइट हाउसमध्ये चित्रीकरणाची परवानगी मिळवण्यासाठी आम्हाला बराच वेळ थांबावे लागले. आम्हाला परवानगी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. मी १५ वेळा परवानगी मागितली. तेव्हा कुठे जाऊन मला ही आनंदाची बातमी मिळाली आहे. अमेरिकेतील काही दिग्दर्शक माझे मित्र असल्यामुळे हे संभव होऊ शकले. त्यांनी मला बरीच मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट हाउसमध्ये चित्रीकरण करणरा अरबाज खान हा पहिलाच भारतीय अभिनेता असेल. येथे चित्रीकरण करण्यासाठी कडक सुरक्षेची व्यवस्था करण्यात येत आहे. ‘जीना इसी की नाम है’ हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा आहे. या सिनेमात अरबाज अमेरिकेतील व्यावसायिकेच्या भूमिकेत दिसेल. अरबाजसह या सिनेमात प्रेम चोप्रा, आशुतोष राणा, सुप्रिया पाठक आणि हिमांश कोहली यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होईल.