आपल्या आगामी सिनेमात अर्जुनर डॅडीची म्हणजे अरुण गवळीची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा वास्तवाच्या जवळ जाईल हे तर सगळ्यांनाच माहित होते, पण सिनेमा अधिक वास्तववादी बनवण्यासाठी अर्जुनने काही नियमही तोडले असा आरोप सध्या त्याच्यावर केला जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने अर्जुनने जाणूनबूजून कायद्याचे उल्लंघन केले असा आरोप केला आहे.

२०१४ मध्ये गवळी जेव्हा रुग्णालयात होते, तेव्हा अर्जुन आपल्या व्यक्तिरेखेची तयारी करण्यासाठी त्याला भेटायला गेला होता. या अहवालामध्ये नवी मुंबई येथील पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केला गेला आहे. कारण पोलिसांनी अर्जुन विरोधात कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ही गोष्ट समोर आली होती. ज्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी या घटनेवर लक्ष देण्यात येईल असेही म्हटले होते. त्यानंतर जेजे मार्गाच्या पोलिसांनी अर्जुनची चौकशीही केली होती. पण लवकरच या घटनेला सर्व विसरले. पण आता परत ही घटना पुढे आणण्यात आली आहे.

गवळी याला त्याचे जवळचे डॅडी या नावाने संबोधतात. अरुण गवळीची दगडी चाळीतून २०१४ मध्ये आमदार म्हणून निवड झाली होती. काही दिवसांपूर्वी डॅडी या सिनेमाचा टिझरही प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अर्जुन अरुण गवळीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अर्जुननेही याची कबुली दिली आहे की, तो अरुण गवळीला भेटला होता. यावेळी तो म्हणाला की, कोणत्याही कुख्यात गुंडाला स्वतःची ओळख एक हिरो म्हणून व्हावी असे वाटत नाही. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा तो पेरोलवर बाहेर आला होता. तेव्हा तो मला म्हणाला होता की, एका हिरो स्वरुपात माझी व्यक्तिरेखा लोकांना दाखवू नका. जे मी केले ते केले. त्यासाठी मला शिक्षाही मिळत आहे. पण आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, व्यक्तिरेखेला समजून घेण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नावर कारवाई करण्यात येईल का?

दरम्यान, या सिनेमाच्या पहिल्या लुकचा फोटो अर्जुनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार असून या सिनेमात अर्जुन रामपाल अरूण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘डॅडी’ सिनेमाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल. त्यामुळे दाऊदच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरची निवड करण्यात आल्याचे कळते.