News Flash

व्हिडीओ रेकॉर्ड करून कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण सांगत व्यथा देखील मांडलीय.

मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजू सापते यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण सांगत आपली व्यथा देखील मांडलीय. राकेश मोरया लेबर युनियनच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं या व्हिडीओमध्ये सांगितलंय. यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक राजेश मारुती सापते हे मुंबईमध्ये राहण्यास असून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. राजेश सापते हे फोन उचलत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं. दरम्यान, त्यांनी आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातूनच सर्वसामान्य आणि मनोरंजन विश्वातील व्यक्तींना ही घटना समजली.

आत्महत्या करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडीओमध्ये राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत असल्याच म्हटलं आहे. तसेच त्यांचे कोणतेही पेमेंट बाकी नसल्याचं देखील त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. त्यांचे एकूण पाच प्रोजेक्ट सुरू होते. परंतु, राकेश मोरया लेबप युनियन त्यांना काम करू देत नसल्याने काही प्रोजेक्ट सोडावे लागले आहेत, असं देखील त्यांनी यात म्हटलं आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

आत्महत्येपूर्वी नेमकं राजेश मारुती सापते यांनी काय म्हटलंय?

“नमस्कार, मी राजेश मारुती सापते…. मी आर्ट डायरेक्टर आहे. मी कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मोरया लेबर युनियन हे खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलर ली दिलं आहे. माझी कुठलीही कंप्लेन्ट तिकडे नाही. राकेश मोरया युनियन मधील काही लेबर लोकांना मुद्दामहून फोन करून त्यांच्याकडून वदवून घेत आहेत की, राजू सापते यांनी एक का देड दिया नहीं!…हे काल ही मी क्लीअर केलं आहे. नरेश मिस्त्री नावाच्या व्यक्तीने पण फोन करून विचारलं असता त्यांनी ही सांगितलं की माझं पेमेंट पूर्ण आहे. नरेश मिस्त्री यांनी सांगितलं की आजपर्यंत दादांनी कुठंचही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मोरया हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठंचही काम चालू करू देत नाहीत. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. ज्याची मला, इमिजेट काम सुरू करायच आहे. त्यातला एक प्रोजेक्ट काल मला झी चा सोडून द्यावा लागला. बिकॉज मला ते कामच करू देत नाहीत. दशमी क्रियेशनचं काम चालु असताना ते त्यांनी थांबवलं आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा….धन्यवाद!”

कलादिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येची बातमी परसरताच मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. कलादिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्मत्येनंतर सिनेसृष्टीतील युनियनच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 1:48 pm

Web Title: art director raju sapte committed suicide at pune due to mental harassment prp 93 kjp 91
Next Stories
1 जेव्हा दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत आमिर खानचं नाव जोडलं गेलं होतं!
2 मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या यूजर्सवर भडकली सोना मोहपात्रा; म्हणाली, “मूर्खतेची सीमा पार केली..”
3 आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट ; १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त
Just Now!
X