उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली आहे. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेवर चित्रपट दिग्दर्शक अश्विनी चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. फिल्म सिटी म्हणजे तुम्हाला कॉल सेंटरची इमारत वाटते का? असा सवाल त्यांनी केला आहे.

अवश्य पाहा – “इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अनुरागने मला खोलीत बोलावलं”, अन्…; अभिनेत्रीचा खुलासा

“नव्या फिल्म सिटीचं स्वागत आहे. पण काही मंडळी हिंदी इंडस्ट्रीने आता नोएडामध्ये जायला हवं असा सल्ला देतायेत. या लोकांना कळतंय का ते काय बोलतायत? आपण कॉल सेंटरच्या बाहेर काम करत नाही. चांगली इमारत दिसली की तिथे जायला.” अशा आशयाचं ट्विट अश्विनी चौधरी यांनी केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी नव्या फिल्म सिटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अवश्य पाहा – “मी कधीही ड्रग्ज घेतले नाहीत”; दिया मिर्झा NCBच्या रडारवर

योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नव्या फिल्म सिटीची घोषणा केली. देशाला एका चांगल्या फिल्म सीटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. आम्ही येथे एक भव्य फिल्म सिटीची उभारणी करु. फिल्मसिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र चांगले ठरेल. ही फिल्म सिटी चित्रपट निर्मात्यांना चांगली संधी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. लवकरच यावर काम सुरु करण्यात येईल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.