अभिनेता अतुल कुलकर्णी नेहमीच चौकटीबाहेरच्या भूमिकांना प्राधान्य देतो. लवकरच डिजिटल माध्यमावरील एका सीरिजमध्ये तो अशाच एका चौकटीबाहेरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘द सवाईकर केस’ या गोव्यामधल्या एका कुटुंबावर आधारित एका सीरिजमध्ये अतुल मुख्य भूमिका साकारणार आहे.

हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीतील काही दिग्गज कलाकारांचा यात समावेश आहे. मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम आणि आघाडीचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या फॅमिली थ्रिलरचे दिग्दर्शन करणार आहेत. वूटची निर्मिती असलेल्या ‘द सवाईकर केस’ची कथा गोव्यात घडते. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली.

वाचा : ‘ती फुलराणी’मध्ये मोहन आगाशे यांची एण्ट्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या नव्या भूमिकेबद्दल सांगताना अतुल कुलकर्णी सांगतात, ‘अभिनेता म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो. मला जेव्हा ही भूमिका करशील का असं विचारण्यात आले तेव्हा मी लगेच होकार कळवला. मला नेहमीच चौकटीबाहेरच्या व अनोख्या भूमिका करायच्या होत्या आणि ‘द सवाईकर केस’मधील माझ्या व्यक्तिरेखेला स्वत:चे असे एक तेज आहे जे मी पडद्यावर जिवंत करणार आहे. हे डिजिटल व्यासपीठ भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. यात अतिशय रंजक पद्धतीने कथा मांडल्या जातात. शिवाय, एक कलाकार म्हणून आमच्या भूमिकांसोबत आम्हाला प्रयोग करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अशा प्रगतीशील व्यासपीठाचा भाग बनणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’