रॅपर बादशहा आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. बादशहाचं रॅप आणि जॅकलिनचे ठुमके असलेलं ‘गेंदा फूल’ हे गाणं सुपरहीट ठरल्यानंतर आता दोघेही पुन्हा एकदा प्रेक्षकाचं मन जिकण्यासाठी नवं गाणं घेऊन येत आहेत. बादशहाचं नवं गाणं ‘पानी पानी’ मध्ये जॅकलिनचा जलवा पाहायला मिळणार आहे. या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांची या टीझरला मोठी पसंती मिळाली. काही तासांतच टीझर तुफान व्हायरल झाला आहे.

या टीझरमध्ये बादशहा आणि जॅकलिनचा हटेके लूक पाहायला मिळतोय. या टीझरमधील जॅकलिनच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राजस्थानच्या वाळवंटात या गाण्याचं शूटिंग पार पडल्याचं लक्षात येतंय. तर टीझरमध्ये काही ठिकाणी राजस्थानी पारंपरिक संगीत आणि पारंपरिक वेशभूषेतील लोक दिसून येत आहेत. काही तासांतच या गाण्याला लाखो व्हूज मिळाले आहेत.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हे देखील वाचा: “बॉलिवूडमध्ये अर्जुन कपूर माझा एकमेव खरा मित्र”; केआरकेचा नवा दावा म्हणाला…

बादशहा आणि जॅकलिनचं ‘पानी पानी’ हे गाणं येत्या ९ जूनला रिलीज होणार आहे. बादशहाचं प्रत्येक गाणं म्हणजे म्युझिक प्रेमींसाठी पर्वणी असते. या आधीचं त्याचं ‘गेंदा फूल’ गाणं प्रचंड गाजलं होतं. या गाण्यातील जॅकलिनचा लूक आणि खास करून तिचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या गाण्याचील तिच्या डान्सच्या स्टेप्स खूप हीट ठरल्या. सोशल मीडियावर या गाण्याचे अनेक रील्स व्हायरल झाले होते.

तर बादशहाने आजवर अनेक सुपरहीट गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. डीजे वाले बाबू, वखरा स्वैग, मूव योर लक, पार्टी ऑल नाईट, हैपी हैपी ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आहेत.