बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आज सर्वाधिक कमाई करणारा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. अक्षयचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी अमृतरसमध्ये एका पंजाबी कुटूंबामध्ये झाला. अक्षयचे वडिल हरी ओम भाटिया सैन्यात होते. आई-वडिलांनी अक्षयचे नाव राजीव भाटिया ठेवले होते. मात्र अक्षयने काही दिवसानंतर त्याचे नाव बदलले आणि अक्षय कुमार ठेवले. अक्षयचे संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झाले परंतु काही दिवसानंतर तो मुंबईला शिफ्ट झाला.

अक्षयने १९८७मध्ये महेश भट्ट यांच्या ‘आज’ या चित्रपटातून अभिनेयाच्या दुनियेला सुरुवात केली होती. पंरतु त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनाला फारशी भावली नाही. त्यानंतर १९९१मध्ये अक्षय कुमारने ‘सौगंध’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री राखी आणि शांतिप्रियादेखील होत्या. अक्षय कुमारने ‘खिलाड़ी’, ‘दीदार’, ‘अशांत’, ‘वक्त हमारा है’, ‘सैनिक’, ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘मोहरा, सुहाग’, ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’ चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

अक्षयच्या २९ वर्षाच्या फिल्म इंडस्ट्रीमधील प्रवासात जवळपास ११० चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान अक्षयचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसह जोडण्यात आले होते. या नावांमध्ये रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, आयशा जुल्का आणि प्रियांका चोप्राचादेखील समोवेश आहे. या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव आहे ते म्हणजे पूजा बत्रा आणि या अभिनेत्रीमुळे अक्षयला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्यावेळी अक्षय आणि पूजा ऐकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. पूजा बत्रा त्याकाळातील सर्वात लोकप्रिय मोडेल होती.

अनेक वेळा पूजा फिल्म इंडस्ट्रीच्या पार्ट्यांमध्ये अक्षय कुमारलासोबत घेऊन जात असे. त्यानंतरच अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाल्याचे म्हटले जात आहे. अक्षयने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मानवर अधिराज्य गाजवले आणि मोठा चाहता वर्ग निर्माण केला. अक्षय आणि पूजाचे रिलेशनशीप फार काळ टिकले नाही. अक्षयने २००१ मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले.