News Flash

भारतीचे पाच वर्षांपूर्वीचे ड्रग्ज संबंधीत ट्विट पुन्हा चर्चेत, नेटकरी म्हणाले…

जाणून घ्या काय होते भारतीचे ट्विट..

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ अढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान सोशल मीडियावर भारतीचे पाच वर्षांपूर्वीचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. या ट्विटवरुन तिला ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले भारतीचे हे ट्विट पाच वर्षांपूर्वीचे असून ड्रग्जशी संबंधीत आहे. तिने ट्विटमध्ये ‘कृपया ड्रग्ज घेणे बंद करा. ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत’ असे म्हटले होते. आता एनसीबीकडून अटक झाल्यानंतर पुन्हा तिचे हे जुने ट्विट चर्चेत आहे.

अनेकांनी हे ट्विट शेअर करत तिला ट्रोल केले आहे. एका यूजरने तर ‘भारतीच्या या ट्विटने सिद्ध करुन दाखवले की ती कॉमेडियन आहे’ असे म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत भारती सिंह हिचं देखील नाव समोर आलं आहे. एनसीबीनेत्या दोघांनाही अटक केली असून १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 4:41 pm

Web Title: bharti singh after arrest 5 years old tweet viral avb 95
Next Stories
1 कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला न्यायालयीन कोठडी
2 रसिका सुनीलने गायलेल्या ‘या’ गाण्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद
3 ‘ते जबरदस्ती माझ्या व्हॅनमध्ये…’, अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्यावर केला मानसिक छळाचा आरोप
Just Now!
X