News Flash

प्रेक्षकांची ही इच्छा भाऊने केली पूर्ण

प्रेक्षकांकडून आलेली ही फरमाईश ऐकून भाऊ थोडा बावरलाच

भाऊ कदम

भाऊ कदमचं नाव जरी घेतलं तरी लहान मुलांपासून ते थोरा- मोठ्यांपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं. आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला हसवणाऱ्या या अभिनेत्याचे अजून एक वेगळेच रुप प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे.

भाऊला गायनही आवडते हे फार कमी लोकांना माहित असेल. सततचे दौरे आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे चित्रिकरण यामुळे प्रत्येकवेळी आपली आवड जपायला वेळ मिळतोच असे नाही. पण भाऊ मात्र आपली ही आवड सवडीप्रमाणे जपताना दिसत आहे. भाऊ एका शोसाठी लंडनला गेलो होता. अभिनेता कुशल बद्रिके याबद्दल फेसबूकवरुन सतत अपडेट देत असतोच. या शोसाठी भाऊ कदम, कुशल बद्रिके, विजु माने, मंगेश देसाई, संतोष जुवेकर आणि इतर कलाकारही गेले होते.

कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांनी अचानक भाऊला गाणे गायला सांगितले. प्रेक्षकांकडून आलेली ही फरमाईश ऐकून भाऊ थोडा बावरलाच. पण जनता- जनार्दनला नाराज तरी कसे करना. शेवटी भाऊने एक गाणे गाऊनही दाखवलेच. त्याच्या या गाण्याला चांगलीच दाद मिळाली. त्यांच्या या दादनेच भाऊचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल हे मात्र नक्की.

निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि संपूर्ण टीम त्यांच्या ‘थुकरटवाडी’त आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यात नि:शंक यशस्वी होत आहे. छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या हास्यविनोदी कार्यक्रमाने केवळ मराठी मनातच नव्हे तर इतर भाषिक चित्रपट रसिकांच्या मनातदेखील स्थान मिळवले आहे. मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडमधील शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अॅब्राहम, सोनम कपूर इत्यादी नामवंत मंडळींनीही त्यांच्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर उपस्थिती लावली आहे. या शोमधील हास्यफवाऱ्यांनी दर्शकांबरोबरच सिनेमाच्या प्रसिध्दीसाठी आलेले कलाकारदेखील उपस्थितांसोबत हसूनहसून लोटपोट होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 6:16 pm

Web Title: bhau kadam sang a song for audience
Next Stories
1 मर्यादित स्वरुपात प्रदर्शित होणार शाहरुखचा ‘डिअर जिंदगी’
2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, मराठीतला पहिला मुक थरारपट ‘तथास्तु’
3 ‘डिअर जिंदगी’ का पाहावा याची पाच कारणे
Just Now!
X