07 March 2021

News Flash

‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा,अक्षय कुमार नाही तर कार्तिक करणार धमाल

कियारा अडवाणी आणि तब्बूची प्रमुख भूमिका

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘भुलभुलैया-2’ च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2021 मध्ये ‘भुलभुलैया-2 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमारच्या भुलभुलैया या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. मात्र या सिक्वलमध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची या सिनेमात विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


करोनाचं संकट आणि लॉकडाउनची झळ ही सिनेसृष्टीलादेखील बसली आहे. त्यामुळे 2020 सालात प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अनेक सिनेमांच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या. तर अनेक सिनेमाचं चित्रीकरण रखडलं. यात ‘भुलभुलैया-2’ सिनेमाचाही नंबर लागतो. हा सिनेमा जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रीकरण पूर्ण न झाल्यानं प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर या सिनेमाची तारीख जाहीर करण्यात आलीय. तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या फोटोत कार्तिक आर्यनचा सिनेमामधील लूक दिसून येतोय. भगवी वस्त्र आणि खांद्यावर झोळी घेतलेल्या कार्तिकचा लूक भुलभलैयाच्या पहिल्या भागातील अक्षय कुमारच्या लूक सारखाच दिसून यतोय. तर दुसरा फोटो हा सिनेमाच्या टीमची आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अक्षय कुमारच्या ‘भुलभुलैया’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. या सिनेमातून अक्षयनं प्रेक्षकांच मनोरंजन केलं होतं. त्यामुळे आता कार्तिक आर्यनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय का हे जाणून घेण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 2:04 pm

Web Title: bhulaiyaa 2 release date announced kartik aaryan will play lead role kpw89
Next Stories
1 ‘मला थोडा वेळ द्या’; पैसे थकवल्याच्या आरोपावर मंदार देवस्थळींचा खुलासा
2 ‘रुही’ सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज, राजकुमारसोबत जान्हवीचे ठुमके
3 वडिलांच्या पावलावर पाऊल! आदेश बांदेकरांच्या मुलाचं कलाविश्वात पदार्पण
Just Now!
X