27 November 2020

News Flash

‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना धक्का; लव वाचला, प्रियांक शर्मा घरातून बाहेर

लव घराबाहेर जाईल, असा सर्वांचा अंदाज होता.

Bigg Boss 11 : सध्या हिना खान आणि शिल्पा शिंदे या दोघी शो जिंकल्याच्या थाटातच वावरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हिना खान जिंकण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, ही माहिती कितपत खरी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बिग बॉसचा यंदाचा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, जसजसा या कार्यक्रमाचा शेवट जवळ येत चाललाय तसतसे अनेक धक्कादायक निकाल समोर येताना दिसत आहेत. शिल्पा शिंदे आणि हिना खान या दोन तगड्या स्पर्धकांनी अजूनही घरात टिकून राहण्यात यश मिळवले आहे. मात्र, दुसरीकडे हितेन तेजवानी आणि अर्शी खान या संभाव्य विजेत्यांना अचानकपणे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यावेळी ‘विकेंड का वार’ या स्पेशल एपिसोडमध्येही असाच आणखी एक निकाल पाहायला मिळणार आहे. यावेळी व्होटआऊटसाठी लव आणि प्रियांका यांना नॉमिनेट करण्यात आले होते. त्यामुळे प्रियांकच्या तुलनेत कमकुवत स्पर्धक असणारा लव घराबाहेर जाईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निकाल समोर आला तेव्हा अनेकांना धक्का बसला.

सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या भागात बिग बॉसच्या घरातून प्रियांकला बाहेर जावे लागणार आहे. तर लव त्यागीने पुन्हा एकदा घरातील स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे. लव आणि पुनीश सध्याच्या घडीला घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक समजले जातात. मात्र, गेल्या काही आठवड्यातील धक्कादायक निकालांमुळे या दोघांनी आश्चर्यकारकरित्या घरातील आपले स्थान टिकवले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत बिग बॉसमध्ये रटाळपणा येत चालल्याची टीका होत आहे. सध्या हिना खान आणि शिल्पा शिंदे या दोघी शो जिंकल्याच्या थाटातच वावरत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हिना खान जिंकण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, ही माहिती कितपत खरी ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 2:00 pm

Web Title: bigg boss 11 evicted contestant priyank sharma there came a time when i wanted to quit the show
Next Stories
1 PHOTOS : बहिणीच्या लग्नात दिसला शाहरुखच्या मुलीचा मोहक अंदाज
2 Rajinikanth political entry : ‘फॅन क्लब’च्या माध्यमातून रजनीकांत उभारणार कार्यकर्त्यांची फौज
3 जस्टिस लीग ‘२०१७ फ्लॉप ऑफ द ईयर’
Just Now!
X