28 September 2020

News Flash

तरुणीला वाचविण्यासाठी गेलेल्या ‘बिग बॉस 8’च्या स्पर्धकाला मारहाण

पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस 8’च्या आरजे प्रीतम सिंह या माजी स्पर्धकाला काही व्यक्तींनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. प्रीतमने ट्विटरच्या माध्यमातून काही फोटो शेअर करत मारहाण झाल्याचं सांगितलं. एका जोडप्याला वाचविण्यासाठी गेलेल्या प्रीतमलाच मारहाण झाल्याचं दिसून येत आहे. प्रीतमने व्हिडीओ शेअर करत आपबिती सांगितली आहे.

८ मार्च रोजी सकाळी ४ वाजता प्रीतम त्याच्या पत्नीसोबत गाडीने बाहेर जात होता. यावेळी तीन तरुण एका मुलाला आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलीला मारहाण करत होते. हे दृश्य पाहिल्यानंतर प्रीतम त्या दोघाना वाचविण्यासाठी गेला. मात्र या तीन तरुणांनी प्रीतमलाच मारहाण केल्याचं समोर आलं. विशेष प्रीतमने पोलिसांना ८ ते १० वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचं त्याने सांगितलं.

“मी आणि माझी पत्नी गाडीने जात असताना वाटेमध्ये काही तरुण एका मुलीची छेड काढत होते आणि दुसरीकडे तिच्यासोबत असलेल्या मुलाला मारहाण करत होते. समोरील हे दृश्य पाहिल्यानंतर आपण काही करु शकत नाही का? असा प्रश्न माझ्या पत्नीने मला विचारला. त्यानंतर मी या मुलांच्या मदतीसाठी धावून गेलो. जवळपास एक तास मी त्या तरुणांसोबत झटापट करत होतो.मात्र हे तरुण त्या मुलाला सोडण्यास तयार नव्हते”, असं प्रीतमने सांगितलं.

वाचा : चितेच्या राखेपासून ‘या’ ठिकाणी खेळली जाते होळी!

पुढे तो म्हणतो, “हा मुलगा आणि मुलगी कॉफी पित असताना मारहाण करणारे तीन तरुण तेथून जात होते. यावेळी मुलीला पाहिल्यानंतर त्यांनी तिच्यावर अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. हे पाहून या मुलाने त्यांना याविषयी जाब विचारला. त्यामुळे या तीन तरुणांनी मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली”.

वाचा : Video : शिल्पा शेट्टीने दिल्या बिग बींच्या स्टाइलमध्ये होळीच्या शुभेच्छा

दरम्यान, “मी ८ ते १० वेळा पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे मी आणि माझी पत्नी जवळच्या पोलीस ठाण्यात गेलो. मात्र हा भाग आमच्या पोलीस लाईनच्या हद्दीत येत नसल्याचं उत्तर पोलिसांनी दिलं”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 1:46 pm

Web Title: bigg boss 8 contestant pritam singh brutally beaten by goons for rescuing a couple ssj 93
Next Stories
1 बिग बॉस फेम शिल्पा शिंदेने सिद्धार्थ शुक्लाला दिली मैदानात उतरण्याची धमकी
2 भांग पिऊन अभिनेत्रीने केला ‘नागिण डान्स’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 Video : अश्लील मित्र मंडळाचे पडद्यामागचे ‘उद्योग’
Just Now!
X