News Flash

Photo : जबरा फॅन! चाहत्याने गाडीवर लिहिलं शिवानीचं नाव

शिवानीच्या प्रेमाखातर या चाहत्याने आणखी एक निर्णय घेतला आहे

शिवानी सुर्वे

कलाकार आणि चाहते यांचं एक आगळंवेगळं नात असतं. काही चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. तर काही चाहते हजारोंच्या फॅन्समधून आपण कसं सगळ्यात मोठा फॅन आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी ते कायम कोणते ना कोणते प्रयत्न करत असतात. काही दिवसापूर्वीच छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठीचं २ पर्व सुरु झालं आहे. यापर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून शिवानी सुर्वे ही सगळीकडे चर्चेचा विषय आहे. माईंडने गेम खेळण्याची पद्धत आणि गुड लुकींगमुळे तिचे असंख्य चाहते झाले आहेत. या चाहत्यांपैकीच एका चाहत्याने शिवानीच्या प्रेमापोटी त्याच्या गाडीवर चक्क शिवानीचं नाव लिहिलं आहे.

‘देवयानी’,’सुंदर माझं घर’, ‘तू जिवाला गुंतवावे’ या मराठी मालिकांनंतर हिंदी मालिकांकडे वळलेल्या शिवानीचे अनेक चाहते आहेत. या मालिकांनंतर शिवानी आता बिग बॉस मराठीच्या २ पर्वामध्ये झळकत आहे. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये आता कमालीची वाढ झाली आहे. त्यातच आता शिवानीच्या एका जबरा फॅनने शिवानीच्या प्रेमापोटी चक्क त्याच्या गाडीवर ‘शिवानी स्टाईल’ या नावाचं स्टीकर लावलं आहे.

शिवानीचा जबरा फॅन असलेल्या या चाहत्याचं नाव निनाद म्हात्रे असं असून तो रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये राहणारा आहे. शिवानी सुर्वेच्या या चाहत्याने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रेंड होत असलेल्या ‘शिवानी स्टाईल’ या हॅशटॅगचा स्टिकर तयार करत गाडीवर चिटकविला आहे.

“शिवानी मला खूप आवडते. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचा बेध़डक स्वभाव खूप आवडतो. ती बिग बॉसमध्ये खूप छान खेळत आहे. माझ्यासाठी ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची विजेती आहे. मी तिच्याप्रेमाखातर शिवानी स्टाइल स्टिकर गाडीवर लावला आहे. आता लवकरच तिच्या फोटोचा वॉलपेपर माझ्या खोलीत लावणार आहे,” असं निनादने सांगितलं.

निनाद म्हात्रे शिवानीसाठी सोशल मीडियावर रोज पोस्ट टाकतो. त्याने तिच्यासाठी फॅनपेज देखील बनवले आहे. तिच्या या बिग बॉसच्या प्रवासात तो तिला भक्कम पाठिंबा देतोय.

दरम्यान,शिवानी सुर्वे हिने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये अभिनेय केला आहे. तिची हिंदी टेलिविजन मालिका ‘जाना ना दिल से दूर’ इंडोनेशियामध्ये सध्या टेलिकास्ट होत असल्याने शिवानीचे जगभरामध्ये फॅन्स आहेत. काही काळापूर्वी तिने गुगल सर्चमध्ये महेश मांजरेकरांनाही मागे टाकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 12:24 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve fan bike sticker shivani style ssj 93
Next Stories
1 ‘तुला पाहते रे’नंतर कोणती मालिका? सुबोध म्हणतो…
2 नात्याला दोन वर्ष पूर्ण, ईशा केसकरने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो
3 आमदाराने केला दीपिका-रणबीरवर ड्रग्स सेवन केल्याचा आरोप, मिलिंद देवरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
Just Now!
X