News Flash

Bigg Boss OTT: सलमान खानने केली ‘बिग बॉस’ सीजन १५ ची घोषणा; टीव्हीवर नव्हे ओटीटीवर होणार रिलीज

बिस बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. यावर आता सलमान खानने ईद निमित्ताने मोठी घोषणा केलीय.

आतापर्यंत टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो असा टॅग प्राप्त केलेला ‘बिग बॉस’ हा शो यंदाच्या सीजनला आपला प्लॅटफॉर्म बदलणार आहे. यंदाचा बिस बॉस १५ चा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. यावर आता स्वतः सलमान खानने आजच्या ईद निमित्ताने मोठी घोषणा केलीय. बिग बॉस १५ चा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. ईद निमित्ताने सलमान खानने बिग बॉस ओटीटीचा पहिला प्रोमो रिलीज करत ही घोषणा केलीय.

बिग बॉस सीजन १५ साठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशात सलमान खानने बिग बॉस ओटीटीची घोषणा करत फॅन्सना जबरदस्त गिफ्ट दिलंय. येत्या ८ ऑगस्ट पासून बिग बॉस ओटीटीला सुरूवात होणारेय. या शोमधील स्पर्धकांची नावे आता समोर येऊ लागली आहे, तर काही सेलिब्रिटींना संपर्क केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. सेलिब्रिटींची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बिग बॉस ओटीटीमधला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे बिग बॉस आधी ‘वूट’वर दिसणार आणि मग टीव्हीवर रिलीज होणार आहे. वूटने नुकतंच्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान मोठ्या आनंदात घोषणा करताना म्हणतो, “आतापर्यंतचा सगळ्यात सेंसेशनल सीजन ठरणार…इतका क्रेझी असणार की टीव्हीवर बॅन होऊन जाईल…या शो मध्ये जनता फॅक्टर सगळ्यात आधी आणि लोकांच्या हातात पॉवर असणार…शोमध्ये ड्रामा, एंटरटेनमेंट आणि इमोशन हे सारं काही असणार…शो कडून तुम्हाला वचन देतो…आता हे किती खरंय हे तुम्हाला शो सुरू झाल्यावर कळेलच.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

टीव्हीच्या आधी वूटवर दिसणार एपिसोड्स

काही दिवसांपूर्वीच वूटने बिग बॉस ओटीटीची घोषणा केली होती. टीव्हीवर शो सुरू होण्याआधीच सहा आठवडे आधीट ‘वूट’वर एपिसोड्स रिलीज करण्यात येणार आहेत. यंदाच्या बिग बॉस ओटीटीमध्ये काही सोशल मीडिया स्टार्स देखील स्पर्धक म्हणून झळकणार असल्याचं बोललं जातंय. बिग बॉस ओटीटी ८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याच्या सहा आठवड्यानंतर १५ ऑक्टोंबरपासून हे एपिसोड्स टीव्हीवर दिसणार आहेत. त्यामूळे फॅन्स जेव्हा वेळ मिळेल तसे एपिसोड्स पाहू शकणार आहेत. या घोषणेनंतर बिग बॉस शो च्या चाहत्यांमध्ये आणखी उत्सुकता वाढलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 9:54 pm

Web Title: bigg boss on ott voot salman khan unveils the first promo of bigg boss prp 93
Next Stories
1 करीना कपूरचा मुलगा जेहचा फोटो आला समोर; ईद निमित्ताने सारा अली खानने शेअर केली झलक; पण हे काय….?
2 Pornographic content case: राज कुंद्राच्या ऑफिसमधून मिळालं सर्व्हर, पॉर्न कंटेंट अपलोड केलं जात होतं?
3 शिल्पा शेट्टी राज कुंद्राला कधी आणि कशी भेटली?
Just Now!
X