03 December 2020

News Flash

Farhan Akhtar Birthday Special : …म्हणून फरहानला आईनेच दिली होती धमकी

Farhan Akhtar- Birthday Special : 'रॉक ऑन' या चित्रपटातून फरहानने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली

Birthday Wishes to Farhan Akhtar :

Farhan Akhtar Birthday: बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरतचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर आणि हनी ईराणी यांचा मुलगा फरहान आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. वयाच्या १७व्या वर्षी फरहानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत फरहानने कलाविश्वातील प्रवासाला सुरुवात केली. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला. तसेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.पण हा चित्रपट फरहानने आईमुळे केल्याचे म्हटले जाते. कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फरहानने काही काळ घरी बसून चित्रपट पाहण्याचे ठरवले होते. पण काही दिवसानंतर फरहानच्या आईने त्याला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. या धमकीनंतर त्याने ‘दिल चाहता है’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती.

 

View this post on Instagram

 

Styled by @rahulvijay1988 for #nutriliteamway #healthyliving #nutritionmatters #fitnessgoals

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

त्यानंतर २००४ मध्ये फरहानने ‘लक्ष्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘दिल चाहता है’ आणि ‘लक्ष्य’ या दोन चित्रपटांनी फरहानला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती.

 

View this post on Instagram

 

Happy birthday brother Joe. Big hug. @rampal72 ..

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून फरहानने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्याला अवॉर्ड देखील मिळाला होता. चित्रपटातील फरहानचा अभिनय आणि गाणे चाहत्यांच्या चांगलेच पसंतीला उतरले होते. त्यानंतर फरहानने ‘लक बाय चांस’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात काम केले. त्याच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2020 10:24 am

Web Title: birthday special farhan akhtar mom tell him to do something after college avb 95
टॅग Bollywood
Next Stories
1 Chhapaak Movie Review : काळजाला भिडणारी ‘रिअल स्टोरी’
2 #JNUViolence: “उगाच आगीत तेल ओतू नका”, अजय देवगणने व्यक्त केलं परखड मत
3 शनायाचा हॉट बिकिनी लूक पाहिलात का?
Just Now!
X