News Flash

सुधीर मुनगंटीवारांनी शेअर केला ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचा व्हिडीओ, म्हणाले..

त्यांनी मालिकेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे भरुभरुन मनोरंजन करत असतात. कधीकधी एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जागरुकता निर्माण करण्यासाठी देखील जाहिरात किंवा मालिकांचा वापर केला जातो. अशीच एक मालिका भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भावली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुकवर सध्याची झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आईचे महत्त्व किती असते हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ शेअर करत, जेव्‍हा एखाद्याच्‍या घरी, भाकरीचे चारच तुकडे आहेत… आणि खाणारी तोंड पाच आहेत, तर त्‍या घरातली एकच व्‍यक्‍ती मला भूक नाही…. असे म्‍हणते ती म्‍हणजे…. ‘‘आई’’ असे त्यांनी कॅप्शन दिले आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत आई आणि मुलामधील नात्याची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे. मालिकेतील आई ही तिच्या मुलासाठी खूप काही करत असते. तरी देखील तिच्या मुलाला ‘आई कुठे काय करते?’ असा प्रश्न पडतो. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देणारा मालिकेतील एक भाग सुनील मुनगंटीवार यांनी शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 5:15 pm

Web Title: bjp leader sudhir mungantivar share video of zee marathi serial aagabai sasu which talk about importance of mother avb 95
Next Stories
1 “कसलं बकवास गाणं आहे”; अभिनेत्याने केलं शहनाजच्या ‘कुर्ता पजामा’ गाण्यावर ट्विट
2 हार्दिक-नताशाचा हटके ‘फॅमिली’ फोटो पाहिलात का?
3 रणबीर कपूरच्या डुप्लीकेटचं निधन; ऋषी कपूर देखील होते त्याच्या लूकचे फॅन
Just Now!
X