dilip-thakurव्याख्यानमाला, चर्चासत्र, इव्हेंट या चारही ठिकाणी एक नाव कॉमन ते म्हणजेच सई ताम्हणकर हे तुमच्या लक्षात आले आहे का? तुम्हालाच कशाला तिला तरी आपण अशा भिन्न संस्कृतीत एकदम फिट्ट बसणार्‍या आहोत याची कल्पना आहे का? पैकी व्याख्यानमालेत तिच्या मुलाखतीचे आयोजन अथवा एखाद्या वृत्तपत्र समूहाच्या विशेष कार्यक्रमात तिला बोलते करणे. ‘लोकसत्ता व्हिवा’च्या मुलाखतीमधेही सईला संधी मिळाली व त्याचा श्रोतावर्ग अधिक समंजस असल्याचे भान ठेवून तिने उत्तरे दिली. चर्चासत्रातही असाच सुशिक्षित रसिक असतो. इव्हेंटमधे अधिकाधिक छान छान दिसायचे असते त्यासाठी स्टार सरावलेला असतो व सतत नवीन फॅशनच्या वस्त्रांना मनसोक्त पसंदी देतो.

सईला असे चौफेर यश कसे मिळाले यावर ‘फोकस’ टाकताना सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती सई चित्रपटसृष्टीत आली त्या आसपासचे वातावरण विचारात घेणे. ती आली, तिला प्रेक्षकांनी पाहिले व तिची वाटचाल सुंदर व सुखद झाली अथवा ती जिंकली असे सोपे वा सरळ गणित नाही वा नसते. जवळपास सर्वच क्षेत्रात एखाद्याच्या कर्तृत्वाला संधी मिळणे वा न मिळणे हे अनेकदा तरी तात्कालिक परिस्थितीवर अवलंबून असते. स्पर्धेत अन्यही कोणी असते वा प्रस्थापितांचे अस्तित्व स्वीकारावे लागते. यात नशिबाची साथ असते की नाही हे लक्षात येते अथवा नाही. कर्तृत्त्वावर आपण बाजी मारून जावू, असा विश्वास असला तरी कर्तृत्त्व दाखवायची संधी मिळायला हवी. चित्रपटाचे जग तर अधिकच बेभरवशाचे! एक सुपरहिट मोठी शिडी ठरतो ती तर अनेकांना हवीय. तर दोन तीन फ्लॉप चित्रपट सापाच्या तोंडातून किती खाली आणतील याचा नेम नाही. त्यातही कोणता चित्रपट प्रेक्षक उचलतील हे कोणीच सांगू शकत नाही. सई चित्रपटसृष्टीत आली तेव्हाच विविध क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडत होत्या त्या सईसाठी अधिक अनुकूल ठरल्या का आणि मग आपल्या गुणवत्तेला व्यावसायिक हुशारीची साथ देत ती यशस्वी ठरली का? आणि तिच्या यशाला प्रातिनिधिक मानायचे काय? सईच्या आगमनाच्या थोड्या अगोदर ‘श्वास’ चित्रपटाने एकूणच मराठी चित्रपटाला उर्जितावस्था आणली होती. मधल्या काळातील सगळी मरगळ, निराशा व कंटाळा दूर गेला होता. ताजे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. याच टप्प्यावर मराठी अभिनेत्रींची परंपरागत पदर संस्कृती मागे पडत होती. जागतिकीकरणाचे वारे येऊन दशकभराचा काळ लोटला होता. जगभरची आधुनिक फॅशन आपल्याकडे हातपाय पसरत होती. उपग्रह वाहिन्या नवीन चेहर्‍याना संधी देत होत्या. त्यात आपणही काही स्थान मिळवू या आशेने छोटी शहरे व तालुका पातळीवरून नवे चेहरे मुंबईत येत होते. सई सांगलीतून आली. कोणी मराठवाडा, विदर्भातून आले. दुसरीकडे पहावे तर क्रिकेटमधेही छोट्या शहरातील खेळाडू स्थान मिळवत आपले अस्तित्व वाढवते होते. ट्वेन्टी-२० क्रिकेट लोकप्रिय होत होते. सर्वच स्तरातील नवीन जग आकार घेत होते व कळत नकळत ते सई ताम्हणकरच्या व्यक्तिमत्व व वाटचाल याना पूरक ठरत होते. मोबाईल व मल्टिप्लेक्स संस्कृती वेगाने आकार घेत होती. वेबसाईट व सिरीज युथमधे लोकप्रिय होत होत्या. हॅरी पॉटर नवीन पिढीचा हिरो होता. बॅटमॅन, स्पायडरमॅन मनोरंजनाचे हुकमी फंडे झाले होते. एन्रीके, सेलिना गोमेज, केटी पेरी, सकिरा यांच्या संगीतात ताल धरला जात होता. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरातील नवश्रीमंत व उच्चभ्रू सुखासीन वर्गात या सार्‍यांची क्रेझ वाढत राहिली. सोशल नेटवर्किंगने जगण्याचे भानच बदलले. जगभरातील माहिती व मनोरंजनाचे विश्वच मुठीत येत गेले. या सार्‍यातून जे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक वातावरण ढवळून निघाले ते सई ताम्हणकरला पूरक ठरले. चित्रपटाच्या यशापयशाच्या पलीकडे जाऊन तिची वाटचाल सुरु आहे यात हे सगळेच बदललेले वातावरण आहे. गंमत म्हणजे सई काय म्हणते यावर प्रसंगी प्रसार माध्यमालाही कुतूहल व तिच्या चाहत्यानाही! मला चांगले पैसे देईल त्या राजकीय पक्षाचा मी प्रचार करेन हे तिचे वक्तव्य बातमीचे हेडिंग ठरलेच पण तिच्या याच वक्तव्यावर उपग्रह वाहिन्यांवर तासाभराचे थेट प्रक्षेपणाचे चर्चासत्र आयोजिले गेले. काही वादग्रस्त विषयावर सईने आपल्या वाहिनीवर यावे व स्पष्टपणे आपली मते मांडावीत असे मराठीप्रमाणेच काही हिंदी वाहिन्यांनाही वाटते हे विशेषच. हे नेमके कधी सुरु झाले हे कदाचित खुद्द सईलाच आता सांगता येणार नाही. पण कळत नकळतपणे जे जे घडत गेले ते तिच्या पथ्यावर पडले व सई ताह्मणकर हे या दशकातील हुकमी नाव झाले.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

नागपूर या मोठ्या व वाढत्या शहरातील नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गातील युथमध्ये या सार्‍यातून नवीन आधुनिक दृष्टिकोन विकसित होत होता. त्याला सई ताम्हणकर आपलीशी वाटली. या युवाने पहिली पसंती सईच्या आकर्षक व्यक्तिमत्व व स्पष्ट बोलण्याला दिली व मग तिच्या चित्रपट व भूमिकांचा स्वीकार केला. मराठी चित्रपटाच्या वाटचालीत हे असे पहिल्यांदाच घडले याचे कारण सामाजिक सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रात झालेला केवढा तरी बदल. सई ताम्हणकर याच नवीन विश्व व वातावरणातील यशस्वी अभिनेत्री आहे. सईची काही मराठी चित्रपटातील दृश्ये जुन्या पिढीच्या भुवया उंचावणारी ठरली तर नवीन पिढीला ती स्वाभाविक वाटली. ‘पुणे ५२’ मधील गिरीश कुलकर्णीसोबतचे शृंगारिक दृश्य, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ व ‘अशाच एका बेटावर’ यातील बिकीनी रुप यासाठी लागणारी मानसिक ताकद सईने दाखवली. काहींनी यावर शेरेबाजीही केली व या चित्रपटांना यशही मिळाले नाही. तरी सईच्या लोकप्रियतेत फरक पडला नाही हे जास्तच कौतुकास्पद! अन्य तारकांची स्पर्धा जाणवणार व सतत नवीन चेहरे येणार त्यात आपण टिकून राहायला हवे याचे सईला भान आहे. तर काही चांगल्या भूमिकांमुळेच चित्रपटसृष्टी आपली गंभीर दखल घेऊन आपली पुढील वाटचाल होईल असेही तिच्या लक्षात आले आहे.

आजच्या वायफाय सायफाय संस्कृतीत सईचे वागणे बोलणे वावरणे पाहणे एकदम सही आहे. अर्थात हे काहीसे नकळत व योगायोगातून घडत गेले. त्यातच मग सईने आपल्याच काही चित्रपटांच्या पूर्वप्रसिध्दीत स्वतःच लक्ष घातले. आपला चित्रपट सर्वच माध्यमातून रसिकांसमोर जाईल यावर राज्यभर मेहनत घेतली. मराठी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर आपण असणे वा येणे. अगदी इंग्रजी प्रतिष्ठित अंकाच्याही कव्हर पेजवर आपण असावे यासाठीचे तिचे यशस्वी प्रयत्न आजच्या वेगवान व व्यावसायिक काळाशी सुसंगत आहेत. यात ती स्टार म्हणूनच वावरते व अगदी असेच वागायले हवे. हीच आजच्या काळातील मोठीच गरज आहे.

एखाद्या क्षेत्रात कोणत्या काळात प्रवेश होतो, हे कसे महत्त्वाचे ठरते याचे हे उत्तम उदाहरण. या सार्‍यातून एक महत्त्वपूर्ण गोष्ट जाणवेल, ती म्हणजे सईचा हा सगळाच प्रवास बराचसा सोलो ट्रॅव्हलर आहे. चित्रपट निर्मिती हे टीमवर्क कल्चर असले तरी त्यातही स्वतःचा अनुभव वापरत वापरत आपला रस्ता आपणच काढावा लागतो. तो आखीव रेखीव नसतो. कधी कोणते वळण घाट दरी येईल हे सांगता येत नाही अशा वेळेस पुढील प्रवासाचे निर्णय आपणच घ्यायचे असतात. आजच्या युवकात ही सोलो ट्रॅव्हलरची भावना वाढते .सई याच युवा पिढीची प्रतिनिधी आहे ही तर केवढी मोठी वस्तुस्थिती! कलाकाराच्या यशापयशात आजूबाजूचेही काही घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी असतातच…. फक्त ते असे पाहण्याची दृष्टी हवी. होय ना?

या सार्‍यातून सई चंगळवादी संस्कृतीचे प्रतिक असा चुकीचा अर्थही काढू नये. याच दशकात शहरी नाईट लाईफ फोफावले. लेट नाईट पार्टी, सॅटर्डे नाईट पार्टी, पब, क्लब कल्चर, मैत्री व प्रेम या नात्यातील वैचारिक गोंधळ, प्रत्येक क्षेत्रातील कारकिर्दीवरचा वाढता फोकस, व्यक्तीकेंद्रित मानसिकता, हायवे व सी लिंक प्रवासाची गतिमान दृष्टी, जगभर फिरण्याची व इतरत्रची जीवनशैली जाणून घेण्याची वृत्ती, थाई वा अन्य फूडचे आकर्षण, पाहुण्याला घरी बोलावण्यापेक्षा कॉफी शॉपमध्ये भेटीला बोलावण्याची वाढती वृत्ती, युवतींसाठी आलेल्या सिगारेट, कधीतरी त्याना उंची मद्याचा घ्यावासा वाटणारा आस्वाद, मिडनाईट मॅटिनी कल्चर, ब्रॅन्डेड कपडे, सेल्फी संस्कृती….असे करता करता लैंगिक संबंधाची मैत्रीपूर्ण चर्चा असा एकूणच सर्वच स्तरावर समाज बदलत गेला, त्याला गती कधी आली व तो स्वीकारला कधी व कसा बरे गेला हेही जाणवले नाही. या सार्‍यातून जो नवा शहरी समाज विकसित झाला ती मानसिकता, दृष्टिकोन व जीवनशैलीत सई ताम्हणकर कळत नकळत फिट बसते. नवीन युगाची ती सही अभिनेत्री आहे असा फोकस टाकताना तिच्या यशाची काही कारणे निश्चित सापडतात. चित्रपट व त्याचे कलाकार यावर बदलत्या काळानुसार दृष्टी टाकणे अधिकच संयुक्तिक आहे.
– दिलीप ठाकूर