बॉलिवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता बॉबी देओल त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरिजमुळे चर्चेत होता. बॉबी हा धर्मेंद्र यांचा छोटा मुलगा आणि सनी देओलचा छोटा भाऊ आहे. संपुर्ण कुटूंब हे अभिनय क्षेत्राच असूनही बॉबी सतत चित्रपटात दिसला असं नाही. बॉबी देओल हा एक अभिनेता आहे, हे लोकांच्या लक्षात रहाव म्हणून त्याने काही चित्रपट केले असे वक्तव्य बॉबीने स्वत: केले आहे.

कोईमोईने दिलेल्यावृत्तानुसार, “मी माझ्या करिअरमध्ये चढ-उतार पाहिले आहेत आणि माझ्या करिअरमध्ये एक क्षण असा आला होता की मी इतका काही लोकप्रिय नव्हतो. जेव्हा असे काही घडते तेव्हा आपण अनेक कलाकारांसोबत चित्रपटात काम करण्याची संधी शोधतो. तेव्हा सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे आपोआप येते. जसे मी ‘रेस ३’ आणि ‘हाऊसफुल ४’ हे चित्रपट केले. या चित्रपटांमध्ये बॉलिवूडमधला सुपरस्टार सलमान खान आणि अक्षय कुमार होते, आणि मला माहित होतं की यांचे चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहात जाणार आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की बॉबी देओल अजून ही आहे. या सगळ्यामुळे खूप मोठा फरक पडतो,” असे बॉबी म्हणाला.

पुढे बॉबी म्हणाला, “त्या भूमिकेचे काय महत्त्व आहे यावर मला भूमिका साकारायला आवडतात. मी मुख्य भूमिका साकारली पाहिजे असे नाही. मला एक अशी भूमिका साकारायची आहे जी वेगळी असेल भविष्यात जाऊन मला अशाच भूमिका करायच्या आहेत. एक अभिनेता म्हणून माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन एखादी भूमिका साकारणे हे अधिक आव्हानात्मक आहे,” या क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल देखील बॉबीने वक्तव्य केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बॉबी म्हणाला की, “स्पर्धा ही नेहमीच होत असते. आपण जर स्वत: साठी बोललो नाही, तर लोकांना आपण दिसणार नाही. एक अभिनेता म्हणून, आपण उत्तम भूमिका साकारलीच पाहिजे. स्वत:कडे लक्ष द्या. सगळ्यांच्या लक्षात राहण्यासाठी मेहनत करा.”

बॉबी देओलचे ‘गुप्त’, ‘सोल्जर’, ‘करिब’, ‘अजनबी’, ‘हमराज’ आणि ‘यमला पगला दिवाना’ हे चित्रपट विशेष गाजले. तर बॉबीची आश्रम ही वेब सीरिज अत्यंत लोकप्रिय आहे.