News Flash

शंभरी पार केलेल्या फॅनची बिग बींनी घेतली भेट

कलाकारांनाही चाहत्यांच्या प्रेमाचं अप्रूप वाटतं

छाया सौजन्य- ट्विटर

बऱ्याच दशकांपासून हिंदी चित्रपसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या काही अभिनेत्यांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचं नाव अग्रस्थानी आहे. विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय देत त्यांनी असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. वयाची सत्तरी ओलांडूनही त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि त्यांच्या अभिनय कौशल्यावर वयाचा तिळमात्रही फरक पडला नाहीये. अशा या बड्या अभिनेत्याला भेटण्याची सर्वांचीच इच्छा असते आणि अशी संधी मिळाल्यावर चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाही.

आवडत्या कलाकाराची भेट घेतल्यानंतर चाहत्यांना होणारा आनंद स्वाभाविक आहे. कलाकारांनाही चाहत्यांच्या प्रेमाचं अप्रूप वाटतं आणि त्याचंच उदाहरण बिग बींनी केलेल्या एका ट्विटमधून पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या असंख्य चाहत्यांपैकी अशाच एका चाहत्या आजीबाईंची भेट त्यांनी घेतली. मुख्य म्हणजे या आजींचं वय पाहता त्यांचं कौतुक करावं तितक कमी आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर बिग बींनी ट्विटरवर फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘१०३ वर्षांच्या ख्रिस्टिन यांची बऱ्याच वर्षांपासून मला भेटण्याची इच्छा होती आणि आज ते शक्य झालं.’ आपल्या या चाहतीची भेट घेतल्यानंतर त्यांना भेटल्याचा आनंद बिग बींच्या ट्विटमधून व्यक्त होत आहे.

वाचा: … यांना ओळखलंत का?

चाहत्यांचं प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारा सन्मान याचं बिग बींना नेहमीच कौतुक असतं. ते कधीही चाहत्यांना निराश करत नाहीत. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा घरासमोर उभ्या हजारो चाहत्यांच्या शुभेच्छांचा ते मोठ्या मनाने स्वीकार करतात. म्हणूनच की काय ते खऱ्या अर्थाने या चित्रपसृष्टीतील ‘सरकार’ म्हणवले जातात.

वाचा: ‘केबीसी’मध्ये आता बिग बी नाही, तर ही अभिनेत्री असू शकते नवी होस्ट

येत्या काळात ते ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटामध्ये ते पहिल्यांदाच परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. आमिर खान आणि अमिताभ बच्चन ही दोन नावं एकत्र आल्यामुळे आतापासूनच या चित्रपटाची चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 10:44 am

Web Title: bollywood actor amitabh bachchan meets his 103 year old fan and posts a photo on twitter
Next Stories
1 Abhijeet Bhattacharya ban on twiiter : ‘ट्विटर राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी आणि मोदीविरोधी’
2 माझा किताबखाना : टप्प्याटप्प्याने बदलणारा मयुरीचा किताबखाना
3 कानमध्ये रंगला ‘दशक्रिया’ चित्रपटाचा खेळ!
Just Now!
X