23 November 2017

News Flash

‘टायगर जिंदा है’च्या क्लायमॅक्सची दृश्यं लीक?

सलमान आणि कॅटच्या केमिस्ट्रीसोबतच अफलातून स्टंटबाजीसुद्धा पाहता येणार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 4:57 PM

टायगर जिंदा है

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट बऱ्याच कारणांनी अनेकांचं लक्ष वेधतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यासोबतच या चित्रपटामध्ये सलमान बरीच साहसदृश्येसुद्धा करताना दिसणार आहे. भाईजान सलमान नेमकी कोणती साहसदृश्ये करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच या चित्रपटातील काही दृश्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘आज तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लीक झालेली ही दृश्ये चित्रपटाच्या क्यायमॅक्समधील असून, त्यात सलमानचा वेगळा लूक पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सलमान निळ्या रंगाच्या एका जुन्या कारमध्ये स्टंट करताना दिसतोय. दोन्ही हातात बंदुका घेऊन तो शत्रूवर हल्लाही करताना दिसतोय. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर एक जखम झाल्याचं पाहायला मिळतंय.

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

या चित्रपटातील लीक झालेली ही दृश्यं पाहता सलमान आणि कॅटच्या केमिस्ट्रीसोबतच अफलातून स्टंटबाजीसुद्धा पाहता येणार आहे, असंच म्हणावं लागेल. या चित्रपटातील साहसदृश्यं अधिक प्रभावी करण्यासाठी अॅक्शन डिरेक्टर टॉम स्ट्रथर्स यांना पाचारण करण्यात आलं आहे. या चित्रपटासाठी सलमानने घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, सध्या अबुधाबीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. अली अब्बास जफर आणि सलमान खान ‘टायगर…’च्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. याआधी त्या दोघांनी ‘सुलतान’ या चित्रपटाच्या वेळी एकत्र काम केलं होतं.

First Published on September 14, 2017 4:57 pm

Web Title: bollywood actor salman khan tiger zinda hai movie climax stunt scene leaked rumors see photos