बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय़ात पोहोचलं. विनय तिवारी यांचं मुंबईतील क्वारंटाइन संपवण्याबाबत गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच यामध्ये विनय तिवारी यांना त्वरित सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतप शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेनं विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती. तसंच सुशांत सिंह याच्या मृत्यूप्रकरणी तपासासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्या तापस करू देण्याऐवजी क्वारंटाइन करम्यात आलं आणि हे म्हणजे अवैधरित्या त्यांना ताब्यात घेण्यासारखं असल्याचं याचिकेत म्हणण्यात आलं होतं. तसंच मुंबई महानगरपालिकेद्वारे एका आयपीएस अधिकाऱ्याचे व्हर्च्युअल हाऊस अरेस्ट हे त्यांच्या मूलभूत अधिकारांविरोधात आहे. त्यांच्यासाठी १४ दिवसांच्या क्वारंटाइनचा नियम लागू होत नाही असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं. ही या याचिका सामाजिक कार्यकर्ते नलिन एम मिश्रा यांनी दाखल केली होती.

तर दुसरीकडे आज मुंबई महानगरपालिकेनं विनय तिवारी यांना ७ दिवसांच्या मुंबईतून बाहेर जाण्याचे निर्देश दिले आहे. ते आपल्या क्वारंटाइनचे सात दिवस पूर्ण करुन ८ ऑगस्टपर्यंत पाटण्यात परतू शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. २४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या महिन्यात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रिया चक्रवर्तीचे नाव घेतले. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक जणांची या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे.