News Flash

VIDEO : ‘परी’पासून पळ काढणं अशक्यच!

तिचा हा अंदाज दचकावणाराच आहे.

अनुष्का शर्मा

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा तिच्या आगामी चित्रपटाचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याचं पाहायल मिळत आहे. मन कितीही धीट असेल तरीही घाबरवणारे हे प्रोमो ज्यांच्या उल्लेख अनुष्का आणि ‘परी’ची संपूर्ण टीम ‘स्क्रीमर’ म्हणून करत आहे त्याचीच चर्चा चित्रपट वर्तुळात रंगत आहे. हे स्क्रीमर पाहता अनुष्काने नक्की काय करायचं ठरवलंय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. कारण प्रत्येक व्हडिओतून परीची थरकाप उडवणारी बहुविध रुपं प्रेक्षकांना घाबरवून सोडत आहेत.

‘परी’ या भयपटाच्या निमित्ताने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणारी अनुष्का शर्मा त्यांचा चक्क थरकाप उडवतेय. घराची गॅलरी, जंगल या ठिकाणांवर दिसलेली ही परी आता थेट शवगृहात पोहोचली आहे. ‘परी’च्या या प्रोमोमध्येही पार्श्वसंगीताची महत्त्वाची भूमिका असल्याचं लक्षात येत आहे. त्याशिवाय अनुष्काच्या चेहऱ्यावरील भाव पाहता खरंच एखाद्याची झोप उडणार याचीच अनुभूती होतेय. यावेळी ही भीतीदायक ‘परी’ थेट शवगृहात जाऊन पोहोचली आहे.

‘श्रीदेवी यांचे आयुष्य पिंजऱ्यातील पक्ष्याप्रमाणे’

शवगृहात मृतदेह ठेवण्यात येतात ते खण आपोआप उघडत असून, परी म्हणजेच अनुष्का वरच्या बाजूला बसलेली दिसते. तिचा हा अंदाज दचकावणाराच आहे. अनुष्काचा लूक, पार्श्वसंगीत आणि कोणताही संवाद नसताना मोठ्या प्रत्ययकारीपणे साकारण्यात आलेल्या या दृश्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. प्रसित रॉय दिग्दर्शित ‘परी’ हा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार असून, आता तो प्रेक्षकांची मनं जिंकतो इतर चित्रपटांना घाबरवतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 1:19 pm

Web Title: bollywood actress anushka sharma upcoming movie pari screamer 6 watch video
Next Stories
1 श्रीदेवींच्या ‘हवा-हवाई’ गाण्यातल्या काही अर्थहीन ओळींमागचा रंजक किस्सा
2 VIDEO: लेकीसोबत श्रीदेवी यांची अखेरची बाईक राइड
3 Sridevi demise: प्रश्न विचारणं हे माध्यमांचं कामच- अन्नू कपूर
Just Now!
X