01 December 2020

News Flash

प्रियांकाने लग्न केलंय म्हणे… चर्चा तर होणारच

सध्या आसाम दौऱ्यावर असणाऱ्या प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे, ती म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजाच्या. पण, सोनमच्या लग्नाच्या चर्चांवरून आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बसला ना तुम्हालाही धक्का? असं एकाएकी प्रियांकाच्या लग्नाविषयी का बोललं जातंय हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. ज्यावेळी तुमच्या हातात अंगठी दिसेल तेव्हा तुमच्या वैवाहिक आयुष्याविषयी सर्वांनाच माहिती होईल तोपर्यंत तुम्ही सिंगलच असाल, हाच, प्रियांकाचा आयुष्याकडे आणि लग्नाच्या विषयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन. तिचं हेच वक्तव्य आणि सोशल मीडियावरचा एक फोटो पाहता आता या देसी गर्लच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

‘फिल्मी बीट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रियांकाने गुपचूप लग्न केलेलं असू शकतं. सध्या आसाम दौऱ्यावर असणाऱ्या प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ज्या फोटोमध्ये चक्क तिच्या मंगळसूत्रावर सर्वांचं लक्ष जातंय. हे मंगळसूत्र प्रियांकाने गळ्यात घातलं नसून एखाद्या ब्रेसलेटप्रमाणे हातात घातलं आहे.

प्रियांकाने हातात घातलेलं ते ब्रेसलेट पूर्णपणे एखाद्या मंगळसूत्राप्रमाणेच वाटत असून सध्याचा ट्रेंड पाहता फॅशन जगतातही हा ट्रेंड चांगलाच रुळला आहे. त्यामुळे आता देसी गर्लनेही चक्क तिच्या हातातच मंगळसूत्र घातल्याचं म्हटलं जात आहे. देसी गर्लच्या हातातील ते ब्रेसलेट हे फक्त एक फॅशन ट्रेंड आहे की त्यापलीकडे जाऊनही त्याचं काही महत्त्वं आहे, हे फक्त प्रियांकाच जाणते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रियांकाच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा : त्याने मला स्पर्श करण्यास सुरुवात केली अन्…, कास्टिंग काऊचबाबत मराठी अभिनेत्रींनी केला धक्कादायक खुलासा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 4:57 pm

Web Title: bollywood actress priyanka chopra secretly get married question asked by netizens many says she is wearing a mangalsultra see photo
Next Stories
1 Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार ‘तुझी माझी जोडी’चा खेळ
2 Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा पहिला कॅप्टन झाला बेघर
3 वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण होण्याआधीच नशीबानं सोडली साथ, डान्सर विनोद ठाकूर ICU त दाखल
Just Now!
X