04 March 2021

News Flash

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुखरूप वापसीसाठी बॉलिवूडची प्रार्थना

'दुनिया के हर कोने में बैठा भारतीय आपकी बहादुरी का क़ायल है और आपके साथ है!'

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. त्यानंतर, बुधवारी पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार, तोफांचा भडिमार आणि लढाऊ विमानांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरूच होता. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. त्यांना सहीसलामत भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण देश आणि बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा पुढे येत अभिनंदन यांच्या सुखरुप वापसीसाठी प्रार्थना करत आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘शीश झुका कर.. अभिनंदन’, असे ट्विट केले आहे. अभिनंदन यांच्या सुरक्षित वापसीची प्रार्थना करत त्यांनी तिरंग्याचा इमोजी शेअर केला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनंदन यांचा एक फोटो शेअर कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत.

विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणं थांबवा असं आवाहान अभिनेत्री रेणुका शहाणेंनी केले आहे. ‘परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपले हवाई दल सज्ज आहे. पण अभिनंदन यांचा व्हिडिओ शेअर करणं थांबवा. आपल्या बेजबाबदार वागणुकीने त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या,’ असं ट्विट रेणुका यांनी केले आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ फेम अभिनेता विकी कौशल, हृतिक रोशन, फरहान अख्तर या अभिनेत्यांनीही ट्विट करत अभिनंदन यांच्या वापसीसाठी प्रार्थना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 11:35 am

Web Title: bollywood celebs pray for safe release of wing commander abhinandan from pakistan
Next Stories
1 चित्रपट प्रदर्शित होऊन महिने उलटले तरीही मानधन नाही, ‘पलटन’च्या कलाकार, क्रू मेंबरचा आरोप
2 ..म्हणून कंगना म्हणते, ‘मेंटल है क्या’चे प्रदर्शन पुढे ढकला
3 ऑस्कर पार्टीत प्रियांका आणि निकने एकमेकांना दाखवल्या वाकुल्या
Just Now!
X