21 January 2021

News Flash

Manmarziyan Trailer: जोडीदाराच्या शोधात निघाला आहे अभिषेक, इथे कोणाच्या ‘मनमर्जियां’ चालणार?

हा चित्रपट सर्वतोपरी अनुराग कश्यपच्या पठडीतील असून, तो पुन्हा एकदा प्रेमाच्या परिभाषा बदलण्याचं काम करणार का?

अभिषेक बच्चन, Manmarziyan Trailer video

प्रेमाकडे अगदी वेगळ्याच आणि सहज दृष्टीकोनातून पाहणाऱ्या प्रेमी युगुलापासून ते आपल्याला काय साथ देईल अशा साथीदाराच्या शोधात निघालेल्या व्यक्तीपर्यंत तीन वेगवेळ्या व्यक्तीरेखा ‘मनमर्जियां’च्या ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पंजाबची पार्श्वभूमी आणि त्याला प्रेमाची जोड देत साकारण्यात आलेल्या कथानकाला तगड्या कलाकारांची जोड मिळाल्यामुळे हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे. त्यातूनही अभिनेता अभिषेक बच्चन या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्याकडे वळला आहे. त्यामुळे त्याच्यासाठीसुद्धा ही एक महत्त्वाची संधी ठरली आहे. या ट्रेलरची जमेची बाजू ठरत आहे ती म्हणजे विकी कौशल आणि तापसी पन्नू यांचा अभिनय. संजू या चित्रपटातील दमदार अभिनयानंतर विकीच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रेम करण्यात जितका पुढे तितकाच जबाबदाऱ्या आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या बाबतीत मागे राहणाऱ्या एका पंजाबी तरुणाच्या भूमिकेत तो दिसत आहे. तर याच तरुणावर जिवापाड प्रेम करणाऱ्या त्याच्या ‘डॅशिंग’ प्रेयसीची भूमिका तापसी साकारत आहे.

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

तापसी आणि विकीच्या अभिनयामध्ये अभिषेक कुठेतरी कमी पडत असला तरीही त्याच्या भूमिकेकडे प्रेक्षकांचं लक्ष जात आहे. तेव्हा आता अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही. १४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट सर्वतोपरी अनुराग कश्यपच्या पठडीतील असून, आता तो पुन्हा एकदा प्रेमाच्या परिभाषा बदलण्याचं काम करणार का, आणि अभिषेकने रंगवलेल्या रॉबी या पात्राचा त्याच्या लाईफ पार्टनरसाठीचा शोध संपणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 11:59 am

Web Title: bollywood movie manmarziyan trailer video actor vicky kaushal taapsee pannu hot chemistry abhishek bachchan
Next Stories
1 मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी अक्षय म्हणतो…
2 ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वलमध्ये करिना आणि अर्जुन कपूर
3 अमरिश पुरी यांचा नातूही बॉलिवूडच्या मार्गावर
Just Now!
X