करण जोहर हा विविध कलागुण असलेला व्यक्ती आहे. दिग्दर्शक, निर्माता, फॅशन डिझाइनर, अभिनेता यानंतर तो आता रेडिओ जॉकीसुद्धा झाला. ‘इश्क १०४.८’ वर त्याचा ‘कॉलिंग करण’ हा कार्यक्रम सध्या सुरु आहे. कार्यक्रमाच्या गेल्या भागात करणने ‘घटस्फोटानंतरचे’ प्रेम या विषयावर कॉलर्सच्या प्रश्नांना त्याच्या नेहमीच्याच विचित्र आणि मजेदार शैलीत उत्तरे दिली.

वाचा : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..

घटस्फोटानंतरचे प्रेमसंबंध या प्रश्नानेच ‘कॉलिंग करण’ची सुरुवात झाली. एक कॉलर घटस्फोटानंतर प्रेमात पडली होती. मात्र, तिचा पूर्व पती आणि आताचा प्रियकर यांच्या सवयींमध्ये तिला साम्य दिसून आल्याचे तिने सांगितले. त्यावर बॉलिवूडचा ‘लव्ह गुरु’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या करणने तिला दोघांमध्ये तुलना न करण्याचा सल्ला दिला. तसेच, आधीच्या नात्याचा भूतकाळ मागे ठेवून नव्याने आयुष्य जगण्यास सांगितले.

या एपिसोडमध्ये लक्ष वेधले ते एका विशेष कॉलरने. ही कॉलर होती श्रीदेवी. यावेळी श्रीदेवीला करणला काय सल्ला देशील असे विचारण्यात आले. त्यावर करणला कोणत्याच विषयावर सल्ला देण्याची गरज नाही. कारण तो प्रत्येक गोष्टीत माहिर आहे, असे तिने उत्तर दिले.
बॉलिवूडमध्ये घटस्फोट या विषयावर फार चित्रपट न काढण्यामागच्या कारणाचाही उलगडा करणने यावेळी केला. घटस्फोट ही काही आनंदाची बाब नसते. बॉलिवूडला चित्रपटाचा ‘हॅप्पी एण्डिंग’ करण्याची सवय आहे, असे तो म्हणाला. पण, हे सांगताना करणने ‘साथिया’ आणि ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटांकडे सर्वांचे लक्ष वेधले. या चित्रपटांमधून अपयशी नातेसंबंधामधील गुंतागुंतीच्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आले होते.

वाचा : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच कतरिनाच्या बहिणीचे नखरे!

एपिसोडच्या शेवटी करणने त्याच्या सर्व श्रोत्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. तो म्हणजे, तुमचे आधीचे नाते टिकले नसेल तरी भूतकाळ विसरून पुढे जा आणि भविष्यात कोणालाही डेट करताना अधिक विचार करू नका.