News Flash

.. या छायाचित्रातील आघाडीच्या अभिनेत्याला ओळखलंत का?

सध्या मुंबईमध्ये मामि चित्रपट महोत्सवाला (MAMI) सुरुवात झाली आहे.

'जो जीता वही सिकंदर' हा चित्रपट कोणाला माहित नसेल अशी एखादीच व्यक्ती असेल.

बॉलीवूडमध्ये ९०च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘जो जीता वही सिकंदर’ हा चित्रपट कोणाला माहित नसेल अशी एखादीच व्यक्ती असेल. दोन भावांमधील प्रेम या चित्रपटात पाहावयास मिळाले होते. यात प्रेम, भांडण, शत्रुत्व, आवड या सगळ्यांचा मेळ पाहावयास मिळाला होता. भारतीय खेळावर आधारित या चित्रपटात बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान याने मुख्य भूमिका साकारली होती. नुकताच फराह खानने ‘जो जीता वही सिंकदर’ या चित्रपटातील सर्व कलाकार मंडळीचा एक फोटो शेअर केला आहे. यातील आमिर खानला ओळखणे तुम्हाला नक्कीच कठीण जाईल. पहिल्या रांगेत उजव्या हाताला कोप-यात बसलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मि. परफेक्शनिस्ट आमिर आहे.

सध्या मुंबईमध्ये मामि चित्रपट महोत्सवाला (MAMI) सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवात कोणताच पाकिस्तानी चित्रपट दाखवला जाणार नाहीए. तर दुसरीकडे, करण जोहरच्या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी मनसे चिपपट सेनेकडून केली जातेय. पाकिस्तानी चित्रपट आणि त्यांच्या कलाकारांना भारतात घालण्यात आलेल्या बंदीबाबत विचारले असता आमिरने, याचे उत्तर ‘मामि’ला विचारा असे म्हटले.
दरम्यान, काल आमिरच्या बहुप्रतिक्षित अशा ‘दंगल’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. त्याचीच काही झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. कुस्तीच्या सामन्याच्या जल्लोषामध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. ‘मेडलिस्ट पेडपे नही उगते, उन्हे बनाना पडता है’, असा अमिरचा हरयाणवी बाजातील डायलॉग ट्रेलरच्या सुरूवातीलाच अनेकांची मने जिंकत आहे. महावीर सिंग फोगट यांच्या कुस्तीच्या प्रवासाची आणि देशासाठी सुवर्ण पदक मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करणारा हा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न आपला मुलगाच पूर्ण करणार अशी आस लावून राहिलेल्या महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीच्या पदरी चारही मुलींचाच जन्म होतो. पण त्यांच्या गीता आणि बबिता या दोन्ही मुली काही मुलांपेक्षा कमी नाहीत याची जाणीव महावीर सिंग फोगट यांना झाल्यानंतर या दोन्ही मुलींना कुस्तीसारख्या मर्दानी खेळामध्ये उतरवत त्यांना या खेळासाठी तयार करण्यासाठी महावीर सिंग फोगट यांनी घेतलेली मेहेनत या साऱ्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:40 pm

Web Title: can u recognise aamir khan in this photo
Next Stories
1 आयुष्यातील चढ-उताराचा वेध घेणारा ‘वलय’
2 Bigg Boss 10: ‘बिग बॉस’च्या घरात चोरी करताना दिसले स्वामीजी
3 ‘पान बहार तंबाखू उत्पादन असल्याचे माहित नव्हते’
Just Now!
X