News Flash

दिलजीत दोसांजच्या या शर्टची किंमत तुम्हाला माहितेय का?

या शर्टची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल आवाक.

बॉलिवूड कलाकार हे लग्झरी ब्रँडचे शौकीन असतात. ते सतत आलिशान गाड्या, ब्रँडेड कपडे परिधान करुन फिरताना दिसतात. ते आपल्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकने अनेकांची मने जिंकतात. पण हे कलाकार परिधान करत असलेल्या कपड्यांची किंमत किती असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. नुकताच गायक, अभिनेता दिलजीत दोसांजने परिधान केलेला शर्ट चर्चेत आहे. या शर्टची किंमत ऐकून तुम्हीही आवाक व्हाल.

दिलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने भडक रंगाचा प्रिंटेड शर्ट परिधान केला आहे. त्याने परिधान केलेला शर्ट हा Balenciaga ब्रँडचा आहे. या शर्टची किंमत जवळपास ८० हजार रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

G.O.A.T Brand New Album This JULY #diljitdosanjh

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) on

पंजाबी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर गायक, अभिनेता दिलजीत दोसांजने ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या माध्यमातून दिलजीतने प्रेक्षकांनी मने जिंकली. या चित्रपटाच्या यशानंतर त्याच्या वाट्याला हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित ‘सूरमा’ हा चित्रपट आला. या चित्रपटानेही दिलजीतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘गूड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने अक्षय कुमार आणि करिना कपूर यांच्यासोबत काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 6:01 pm

Web Title: can you guess the price of diljit dosanjhs printed shirt avb 95
Next Stories
1 पोलिसांच्या भीतीने स्पायडरमॅन करतोय लिफ्टने प्रवास; व्हिडीओ होतोय व्हायरल…
2 अलका कुबल पुन्हा दिसणार काळूबाईच्या भूमिकेत
3 सुशांत आत्महत्या प्रकरण: पार्थ पवारांनी केली गृहमंत्र्यांकडे CBI चौकशीची मागणी
Just Now!
X